Sunday, July 7, 2024

Latest Posts

T20 WORLD CUP : Team india च्या स्वागतासाठी क्रिकेटचाहत्यांचा लोटला जनसागर

टी20 विश्वचषक विजेत्या टीम इंडियाची मुंबईमध्ये विजयी मिरवणूक निघणार आहे. सकाळी दिल्लीमध्ये टीम इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर सायंकाळी मुंबईत ओपन बसमधून विजयी मिरवणूक निघेल.

जगातला सर्वात आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. हा खेळ अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत खेळला जातो. त्यात हा खेळ म्हणजे अगदी आबालवृद्धांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यात सध्या हा विशेष सामना फार जोमाने सुरु आहे. अगदी सर्व मंडळी हा सामना झाडून पाहत आहेत. तो म्हणजे टी २० विश्वचषक २०२४ (ICC T20 World cup 2024)  हा होय. हा टी २० विश्वचषक २ जून २०२४ रोजी सुरु झाला आहे. या सामन्यात भारताचा स्फोटक फंलदाज विराट कोहली (Virat Kohali), वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह (Jasprit Bumrah), अक्षर पटेल आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी मोलाची कामगिरी केली. यांच्या योगदानामुळेच भारताला विजयाला गवसणी घालता आली. तब्बल १७ वर्षांनी हे टी-२० विश्वचषक २०२४ भारताने पटकावले आहे.  

टी 20 विश्वचषक विजेत्या टीम इंडियाची मुंबईमध्ये विजयी मिरवणूक निघाली आहे. सकाळी दिल्लीमध्ये टीम इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर सायंकाळी मुंबईत ओपन बसमधून विजयी मिरवणूक निघाली आहे. यांचे आगमन वानखेडे स्टेडियम मध्ये झाले आहे. त्यासाठी दुपारपासूनच चाहत्यांनी नरीम पॉईंटवर गर्दी केली. चाहत्यांची गर्दी वाढत असतानाच मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावली होती. धो धो पावसातही चाहत्यांचा उत्साह कायम होता. रस्त्यावर चाहते दुतर्फा थांबले होते. वानखेडेमध्ये छत्र्या उघडून चाहते बसले होते. जोरदार वाऱ्यासह जसा पाऊसही टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत सहभागी झाला होता काहीसे हे असे वातावरण होते.

चाहत्यांनीही या पावसात टीम इंडियाला उत्साहात सपोर्ट कऱण्यासाठी उभे राहिले आहेत. मरीन ड्राईव्ह चाहत्यांच्या रंगात नाहून निघाले होते. मुंबईकरांच्या स्पिरिटचे सोशल मीडियावर कौतुक होतेय. बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनने वानखेडे स्टेडियममध्ये चाहत्यांना आज प्रवेश मोफत ठेवला आहे. मात्र यासाठी वेळेवर पोहोचण्याची अट होती. त्यामुळे दुपारपासूनच चाहत्यांनी वानखेडेवर गर्दी केली होती. चार वाजताच वानखेडे स्टेडियम चाहत्यांनी गजबजले होते.  हजारो लोक स्टेडियमवर पोहोचले आहेत. आता स्टेडियम पूर्णपणे भरले असून दरवाजे बंद करण्यात आले आहेत. आता या इंडियाचे आगमन मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झाले आहे. आता या ठिकाणी त्यांच्यासाठी छोटा कार्यक्रम होणार आहे. हा उत्सव पाहण्यासाठी भारतातील लोक वेगवेगळ्या ठीकाणांहून आलेली आहेत. भारतीय संघ ज्या रस्त्यावरून मार्गक्रमण करणार होता तो रस्ता आता बदलण्यात आला आहे. हि बस मरिनड्राइव्ह परिसरात अडकली होती मात्र आता ही पुढे सरकली आहे. 

या बसवर टीम इंडियाचा फोटो आहे. ही बस ओपन बस आहे. आवडत्या खेळाडूंच्या एका झलकेसाठी तमाम मुंबईकर , क्रिकेटप्रेमी फार आतुर आहे. या बसमध्ये रोहित शर्मा एका वेगळ्या पोझ मध्ये बसला आहे. जितका उत्साह या बस मध्ये आहे. तितकाच जोश किंबहुना त्याहून अधिक जोश हा या जनसागरामध्ये आहे. करॅकेट हा खेळ आबालवृद्धांच्या आवडीचा आहे. त्यामुळे आज प्रत्येकाच्या मनात एक उत्साहाची तसेच भारावून टाकणारी भावना जागृत झाली आहे. हा कौतुक सोहळा साजरा होत आहे.  

 
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss