Thursday, July 4, 2024

Latest Posts

T20 WORLD CUP : मुंबईत क्रिकेटवीरांचे ‘असे’ होणार स्वागत ..

भारताने जेव्हा २००७ साली पहिला टी २० वर्ल्ड कप जिंकला होता तेव्हा त्यांचे जोरादार स्वागत मुंबईत (Mumbai) करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल १७ वर्षांनी आता मुंबईला ही संधी पुन्हा एकदा मिळाली आहे. त्यामुळे आता मुंबईत कसं जोरदार सेलिब्रेशन होणार,

जगातला सर्वात आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. हा खेळ अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत खेळला जातो. त्यात हा खेळ म्हणजे अगदी आबालवृद्धांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यात सध्या हा विशेष सामना फार जोमाने सुरु आहे. अगदी सर्व मंडळी हा सामना झाडून पाहत आहेत. तो म्हणजे टी २० विश्वचषक २०२४ (ICC T20 World cup 2024)  हा होय. हा टी २० विश्वचषक २ जून २०२४ रोजी सुरु झाला आहे.

या टी २० विश्वचषक २०२४ चा शेवटचा सामना हा २९ जून २०२४ रोजी उत्तम पद्धतीने रंगला. या सामन्यात गेल्या काही दिवसांपासून भारत विजयाच्या दिशेने आगेकूच करताना आपण सर्वानीच पहिला. भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत टी-२० विश्वचषकावर आपलं नाव कोरले आहे. या सामन्यात भारताचा स्फोटक फंलदाज विराट कोहली (Virat Kohali), वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह (Jasprit Bumrah), अक्षर पटेल आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी मोलाची कामगिरी केली. यांच्या योगदानामुळेच भारताला विजयाला गवसणी घालता आली. तब्बल १७ वर्षांनी हे टी-२० विश्वचषक २०२४ भारताने पटकावले आहे.

भारताने जेव्हा २००७ साली पहिला टी २० वर्ल्ड कप जिंकला होता तेव्हा त्यांचे जोरादार स्वागत मुंबईत (Mumbai) करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल १७ वर्षांनी आता मुंबईला ही संधी पुन्हा एकदा मिळाली आहे. त्यामुळे आता मुंबईत कसं जोरदार सेलिब्रेशन होणार, हे आता समोर आले आहे. भारतीय संघ साधारण संध्याकाळी ५.०० वाजता नरिमन पॉइंटला पोहोचेल. तिथे एक ओपन बस त्यांचे स्वागत करत असेल. २००७ साली जेव्हा भारताने टी २० वर्ल्ड कप जिंकला होता तेव्हा निलांबरी नावाची बस खेळाडूंसाठी देण्यात आली होती. त्यामुळे आता अशीच एक खास बस भारतीय संघाला देण्यात येईल. या बसवर भारताच्या खेळाडूंची चित्रं असतील. ही बस नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम इथपर्यंत जाणार आहे.

हे अंतर १ किलो मीटर एवढे आहे. पण चाहत्यांची गर्दी पाहता साधारण एक ते दीड तास या बसला नरिमन पॉइंटहून (Nariman Point) वानखेडे स्टेडियमला जायला लागेल. वानखेडे स्टेडियमपर्यंत बसने प्रवास केल्यावर भारतीय खेळाडू थोडी विश्रांती घेतील. त्यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede Stadium) खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम या मार्गावर चाहत्यांना सेलिब्रेशन करता येईल. पण चाहत्यांना वानखेडे स्टेडियमध्ये सोहळा पाहण्यासाठी सोडणार का, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रसंगी अजून काय काय नवीन मुंबईकर तसेच क्रिकेट प्रेमींना पाहायला मिळणार या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

THE ACADEMY SCHOOL, PUNE (TAS) यांनी केली जागतिक आयआयएमयुएन परिषद आयोजित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss