spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

T20 World Cup: दुसऱ्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा ३० धावांनी पराभव, राहुलच्या खेळीवर पाणी फेरले

वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताला ३० धावांनी पराभव स्वीकारावा लागलाय. दरम्यान, १६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया वेस्टर्नच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजाच्या नाकी नऊ आणले. भारताला २० षटकात ८ विकेट्स गमावून १३२ धावांपर्यंत मजल मारता आली. भारताकडून सलामीवीर केएल राहुलनं (KL Rahul) एकाकी झुंज दिली. त्यानं ५५ चेंडूत ७४ धावांची वादळी खेळी केली. मात्र, राहुल आऊट झाल्यानंतर भारताच्या कोणत्याही फलंदाजाला संघाचा डाव सावरता आला नाही. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यांनाही संघाला विजय मिळवून देता आला नाही.

मोठी बातमी Andheri bypoll Election ! ऋतुजा लटकेंचा उमेदवारीचा मार्ग मोकळा

हेही वाचा : 

Rutuja Latke : मनपाचा ऋतुजा लटकेंना झटका, भ्रष्टाचाराचे आरोप करत हायकोर्टात युक्तिवाद सुरूच

भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने या सामन्यात केवळ ३२ धावा देत ४ षटकात ३ बाद केले. त्याने वेस्टर्न ऑस्ट्रेलियन बॅट्समन बॅनक्रॉफ्ट, सॅम फॅनिंग आणि कर्णधार टर्नरला आपले शिकार बनवले. त्याचबरोबर या सामन्यात वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने ४ षटकात २७ धावांत २ बाद करत चांगले पुनरागमन केले. मागील सराव सामन्यात, त्याने ४ षटकात १२.२० च्या इकॉनॉमीमध्ये ४९ धावा दिल्या होत्या आणि फक्त एक विकेट घेतली होती.

अर्शदीप सिंगलाही ३ षटकात २५ धावा देत १ बाद करण्यात यश आले. त्याचवेळी भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्याला यश मिळाले नाही. भुवनेश्वर कुमारने २ षटकांत १५ धावा, अक्षर पटेलने ३ षटकांत २२ धावा आणि हार्दिक पंड्याने २ षटकांत १७ धावा दिल्या. मात्र, संघाचे फलंदाज आज पूर्णपणे अपयशी दिसले आणि केएल राहुल वगळता एकाही फलंदाजाला धावा करता आल्या नाहीत.

रणवीर सिंग आणि दीपिका लवकरच घेणार घटस्फोट ; या अफवांवर अभिनेत्री दीपिका पदुकोणने सोडले मौन

Latest Posts

Don't Miss