T20 World Cup : आज टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्ध सामना सांगणार, संघातील उणीवा दूर करण्याची शेवटची संधी

T20 World Cup : आज टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्ध सामना सांगणार, संघातील उणीवा दूर करण्याची शेवटची संधी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात महम्मद शमीला अखेरच्या षटकात गोलंदाजी देऊन डेथ ओव्हरचा प्रश्न भारतीय संघाने सोडवला. तर, आता आज न्यूझीलंडविरुद्ध हूक आणि पूल फटक्यांवर कसे नियंत्रण राखायचे याचा अभ्यास भारतीयांना करावा लागणार आहे. ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेपूर्वी उद्या भारताचा दुसरा आणि अखेरचा सराव सामना होत आहे. या लढतीबरोबर सर्व तयारी पूर्ण करावी लागणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिला सराव सामना जिंकल्यानंतर भारताला आज दुसरा सराव सामना न्यूझीलंडसोबत खेळायचा आहे.

Maharashtra Municipal Corporation Election Hearing : महापालिका निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी

पहिल्या सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ६ धावांनी पराभव केला होता, त्यामुळे येथे टीम इंडिया इतर प्रयोग करण्यासाठी सज्ज असेल. कारण यानंतर टी२० विश्वचषकाची खरी परीक्षा सुरू होईल. पहिल्या सामन्यात केएल राहुल, सूर्यकुमार यादव आणि नंतर शेवटच्या षटकात मोहम्मद शमीचा चमत्कार पाहायला मिळाला. आता न्यूझीलंडविरुद्ध, टीम इंडियाला रोहित शर्मा, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार यांसारख्या मोठ्या खेळाडूंना चांगले प्रदर्शन करून दाखवण्याची ही शेवटची संधी असेल.

हेही वाचा : 

CM Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मोदींना पत्र, साखर निर्यातीसाठी खुलं धोरणच सुरु ठेवावं अशी विनंती

भारतीय संघ व्यवस्थापन रिषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकला अधिक पसंती देत आहे. यानंतरच्या सामन्यात पंतलाही संधी दिली जाण्याची शक्यता आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा सराव सामना १९ ऑक्टोबर रोजी ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दोघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होईल. टीम इंडियाचा हा दुसरा सराव सामना स्टार नेटवर्कवर प्रसारित केला जाईल, तसेच डिस्ने-हॉटस्टारवरून ऑनलाइन पाहता येईल.

आजच्या सामन्यात हवामान कोरडं राहणार असून पावसाची कुठलीही शक्यता नाही. खेळपट्टी ही फलंदाजीसाठी अनुकूल असून १८० ते १९० धावा साधारण या मैदानाची सरासरी धावसंख्या आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सराव सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला जात आहे, जिथे टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला गेला.

“मंत्रीपदाला काय करता.. मी स्वत: ला मुख्यमंत्री समजतो”; शिंदे गटातील ‘या’ आमदाराचे वक्तव्य

Exit mobile version