Sunday, June 30, 2024

Latest Posts

T20 WORLD CUP : “आपण विश्वचषक स्पर्धेतील विजयाचा दुष्काळ संपवला.” ; शरद पवारांनी केले कौतुक

दोन्ही खेळाडू अतिशय उत्तम आहेत. फॉर्ममध्ये असतानाच रिटायरमेंट घेणं योग्य असते. दोघांचंही जागतिक क्रिकेटमध्ये मोठं योगदान आहे.

जगातला सर्वात आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. हा खेळ अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत खेळला जातो. त्यात हा खेळ म्हणजे अगदी आबालवृद्धांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यात सध्या हा विशेष सामना फार जोमाने सुरु आहे. अगदी सर्व मंडळी हा सामना झाडून पाहत आहेत. तो म्हणजे टी २० विश्वचषक २०२४ (ICC T20 World cup 2024)  हा होय. हा टी २० विश्वचषक २ जून २०२४ रोजी सुरु झाला आहे. या टी २० विश्वचषक २०२४ चा कालचा दिवस म्हणजे २९ जून २०२४ रोजी शेवटचा सामना रंगणार होता. हा अटीतटीचा सामना अतिशय उत्तम पद्धतीने रंगला. या सामन्यात गेल्या काही दिवसांपासून भारत विजयाच्या दिशेने आगेकूच करताना आपण सर्वानीच पहिला.  तो आपण सर्वानीच काल पहिला. भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत टी-२० विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. या सामन्यात भारताचा स्फोटक फंलदाज विराट कोहली, वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह, अक्षर पटेल आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यांनी मोलाची कामगिरी केली. यांच्या योगदानामुळेच भारताला विजयाला गवसणी घालता आली. तब्बल १७ वर्षांनी हे टी-२० विश्वचषक २०२४ भारताने पटकावले आहे. 

भारतीय संघाने शनिवारी रात्री बार्बाडोसच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टी -20 विश्वचषकावर नाव कोरले होते. या विजयानंतर टीम इंडियावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार (Sharad Pawar) यांनीही पुण्यात बोलताना टीम इंडियाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. ते म्हणाले – “भारतीय संघाच्या या विजयात काहीजणांनी सर्जिकल स्ट्राईकसारखा चमत्कार दाखवला, कोणी चांगला झेल घेतला. या सगळ्यामुळे आपण विश्वचषक स्पर्धेतील (T20 World cup) विजयाचा दुष्काळ संपवला. भारतीय संघाला अत्यंत उत्तम शिक्षक मिळाला. द्रविड यांची कामगिरी महत्त्वाची आहे. द्रविड यांनी दिलेले योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी दिलेले सल्ले यामुळे सामूदायिक यश मिळाले.” 

या सामन्यांनंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) व विराट कोहली (Virat Kohli) दोघेही निवृत्ती घेणार आहेत. या संदर्भात ते म्हणाले की- “दोन्ही खेळाडू अतिशय उत्तम आहेत. फॉर्ममध्ये असतानाच रिटायरमेंट घेणं योग्य असते. दोघांचंही जागतिक क्रिकेटमध्ये मोठं योगदान आहे.  नव्यांना संधी मिळावी, माझ्या मते हा निर्णय योग्य. सचिन तेंडुलकर निवृत्त झाले आणि अनेकांना प्रोत्साहित  केले. या दोघांचा निर्णय बरोबर असून मी त्यांचं अभिनंदन करतो.”

सूर्यकुमार यादव (surykumar Yadav) यांच्या या सामन्यातील कामगिरी बद्दल विशेष कौतुक केले. ते म्हणतात की- “एकेकाळी जगाच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांचं वेगळं स्थान होतं. अलीकडे भारतीय संघाने आपले वेगळे स्थान निर्माण केले. टी -20 विश्वचषक जिंकण्यासाठी भारताला अधिक वेळ लागला.  भारतीय टीमने अद्भुत प्रकारचा चमत्कार केला. सुरुवातीला धावसंख्या पाहिल्यानंतर चिंता वाटावे अशी स्थिती होती. जसप्रीत बुमरा आणि सुर्यकुमार यादव चांगली कामगिरी केली.”

अनेक दिग्गज व क्रिकेटप्रेमींनी या टीम इंडियाला (Team India) भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. तब्बल १७ वर्षानंतर हा विश्वचषक भारताकडे परतला आहे. त्यामुळे हा क्षण भारताच्या दृष्टिकोनातून खूप रोमांचकारी आहे. संबंध देशासाठी आनंदाचा असा दिवस आहे.

हे ही वाचा :

T20 WORLD CUP : PANDYA आणि NATASAचा व्हिडीओ कॉलवर संवाद ; नात्यात सर्वकाही अलबेल

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर आमदार सत्यजित तांबे यांनी उठवला आवाज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss