T20 WORLD CUP : मुंबईत पण गुजरातचा प्रचार का? आमच्यासाठी ही…काय म्हणाले Sachin Sawant?

T20 WORLD CUP : मुंबईत पण गुजरातचा प्रचार का? आमच्यासाठी ही…काय म्हणाले Sachin Sawant?

भारतीय क्रिकेट टीमने बारबाडोस मध्ये साऊथ आफ्रिका संघासोबत  आयसीसी T-20 वर्ल्ड कप २०२४ (ICC T 20 World Cup 2024) चा अंतिम सामना जिंकून भारताचा झेंडा फडकावला. आज T-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघ पाच दिवसांनी भारतात दाखल झाला आहे. दिल्ली विमानतळावर पोहोचताच भारतीय संघाचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले. भारतीय संघ दिल्लीला उशिरा पोहचल्यामुळे त्यांना आराम करायला फार कमी वेळ मिळाला. आज भारतीय  संघ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. मोदींशी भेट झाल्यांनतर टीम इंडिया मुंबईसाठी रवाना झाले आहेत. बीसीसीआयने वानखेडे स्टेडियम येथे मरीन ड्राइव्हला रोड शो चे आयोजन केले आहे. सायंकाळी ५.०० ते ७.०० च्या सुमारास एक बस परेड आयोजित करण्यात आली आहे. यासाठी असणारी बस ही गुजरातवरून मागवण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी टीका-टिप्पणी करायला सुरुवात केली आहे.

काय म्हणाले सचिन सावंत?

2007 च्या वर्ल्ड कप चॅम्पियन टीमचे स्वागत करणारी बस आपल्या मुंबईची होती. आपल्या बेस्ट ची होती. आज वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघासाठी मुंबईकरांच्या नाकावर टिच्चून गुजरात वरुन बस मागविण्यात आली आहे. हा महाराष्ट्राचा अपमान नव्हे काय? देशाच्या आर्थिक राजधानीत त्या दर्जाची बस बनत नाही? मुंबईत पण गुजरातचा प्रचार का? भाजपाचे नेते आशिष शेलार आता मुंबई क्रिकेट असोसिएशनवर आहेत. त्यामुळेच हे घडत आहे. मुख्यमंत्री गप्प का? आम्ही या भयंकर अपमानाचा जाहीर निषेध करत आहोत. आमच्यासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे, असे ट्विट करत सचिन सावंत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

वर्ल्ड कप विजेता टीम से मुंबईत जल्लोषात स्वागत करण्याची तयारी करण्यात आली आहे. यापूर्वी 2007 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या विश्वविजेता टीमची मुंबईत भव्य विक्ट्री परेड काढण्यात आली होती आणि आता आज पुन्हा मुंबईत अशीच एक भव्य परेड निघणार आहे. मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम हा मुंबईतील टीम इंडियाच्या विक्ट्री परेडचा मार्ग असणार आहे. संध्याकाळी पाच वाजता निघणाऱ्या विक्री परेडमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जवळपास दोन तास ही विक्ट्री परेड चालण्याची शक्यता आहे. एका मोकळ्या बसमधून ही विक्ट्री परेड काढण्यात येणार आहे. याबाबतची माहिती रोहित शर्माने यांनी त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा दिली आहे. आम्ही तुमच्या सर्वांसोबत या खास क्षणाचा आनंद घेऊ इच्छितो. चला तर मग 4 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून मरीन ड्राइव्ह आणि वानखेडे स्टेडियम येथे विक्ट्री परेडसह हा विजय साजरा करूया. वर्ल्डकप घरी येत आहे. अशी पोस्ट रोहित शर्मा याने केली आहे.

THE ACADEMY SCHOOL, PUNE (TAS) यांनी केली जागतिक आयआयएमयुएन परिषद आयोजित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version