BAN vs IND श्रेयस अय्यरची धुवाधार खेळी पाहून अनोख्या पद्धतीने विराट कोहलीने केला आनंद व्यक्त

दुसऱ्या कसोटी सामन्यात अय्यरने अश्विनसोबत चांगली भागीदारी केली आणि भारताला २-० अशी कसोटी मालिका जिंकून दिली. यानंतर सोशल मीडियावर एक फोटो वेगाने व्हायरल होत आहे

BAN vs IND श्रेयस अय्यरची धुवाधार खेळी पाहून अनोख्या पद्धतीने विराट कोहलीने केला आनंद व्यक्त

भारतीय क्रिकेट संघाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरसाठी २०२२ हे वर्ष खूप संस्मरणीय असणार आहे. त्याने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एका महान फलंदाजीचे दर्शन घडवले आहे आणि २०२२मध्ये तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. बांगलादेशविरुद्ध मीरपूरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अय्यरने अश्विनसोबत चांगली भागीदारी केली आणि भारताला २-० अशी कसोटी मालिका जिंकून दिली. यानंतर सोशल मीडियावर एक फोटो वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्टार फलंदाज विराट कोहली अय्यरच्या खेळीचे कौतुक करताना दिसला आणि यादरम्यान त्याने अय्यरला मिठीही मारली.

विराट कोहलीने श्रेयस अय्यरला मारली मिठी

भारताच्या दुसऱ्या डावात श्रेयस अय्यरने रविचंद्रन अश्विनसोबत अप्रतिम भागीदारी केली. श्रेयसने नाबाद २९ तर आर अश्विनने नाबाद ४२ धावा करत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. २-० ने मालिका जिंकल्यानंतर विराट कोहलीने अय्यरच्या खेळीचे कौतुक केले. त्याचवेळी, सोशल मीडियावर एक चित्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विराट कोहली बांगलादेशविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर श्रेयस अय्यरला मिठी मारताना दिसत आहे.

श्रेयस अय्यरने २०२२मध्ये हे विशेष यश संपादन केले

श्रेयस अय्यर २०२२मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात अय्यरने ३९ डावात १५८० धावा केल्या, त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने १९ धावा केल्या आणि पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानला मागे टाकून २०२२साली १५९८ धावा केल्या. या यादीत बाबर आझमचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने २४००हून अधिक धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर बांगलादेशच्या लिटन दासचे नाव आहे, ज्याने १९००हून अधिक धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरचे नाव जोडले गेले आहे

हे ही वाचा:

Team Indiaने भारतीय क्रिकेट चाहत्यांना Christmas निमित्त दिली खास भेट, २-० ने मालिका जिंकत केला बांग्लादेशचा पराभव

Christmas Day 2022 कसा हाेता खराेखरचा Santa Claus ?

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.
Exit mobile version