spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Team Indiaने भारतीय क्रिकेट चाहत्यांना Christmas निमित्त दिली खास भेट, २-० ने मालिका जिंकत केला बांग्लादेशचा पराभव

पण श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विनने हे होऊ दिले नाही. दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशचा तीन गडी राखून पराभव केला. त्यांनी सामन्याच्या चौथ्या दिवशी (रविवार) ७ गडी गमावून १४५ धावांचे लक्ष्य गाठले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या ४ बाद ४५ धावा झाल्या होत्या. भारताला विजयासाठी आणखी १०० धावा करणं गरजेचं होतं. बांग्लादेशचा कर्णधार शकीब अल हसन आणि मेहदी हसन मिराज यांनी मिळून आणखी तीन विकेट घेतल्यावर टीम इंडियाचा पराभव होईल असे वाटत होते, पण श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विनने हे होऊ दिले नाही. दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

सामन्याच्या चौथ्या दिवशी खेळ सुरू झाला तेव्हा अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट क्रीजवर होते. उनाडकटने १६ चेंडूत १३ धावा केल्यानंतर शाकिबच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू झाला. त्याच्यानंतर ऋषभ पंतही पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्या डावात ९३ धावांची शानदार खेळी करणाऱ्या पंतला दुसऱ्या डावात केवळ नऊ धावा करता आल्या. त्याला मेहदी हसन मिराजने एलबीडब्ल्यू केले. मेहदी एवढ्यावरच थांबला नाही. अक्षर पटेलला क्लीन बॉलिंग देत त्याने डावातील पाचवे यश मिळविले. अक्षरने ६९ चेंडूत ३४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली.

७४ धावांवर टीम इंडियाच्या सात विकेट पडल्या तेव्हा बांगलादेश चमत्कार करू शकेल असे वाटत होते. भारतीय संघ दडपणाखाली होता. येथून श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विनने डाव सांभाळला. आपल्या अनुभवाचा चांगला उपयोग करून दोघांनी ७१ धावांची नाबाद भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. अश्विन ६२ चेंडूत ४२ तर श्रेयस अय्यरने ४६ चेंडूत २९ धावा केल्या.

मॅक चा स्कोर:

बांग्लादेश पहिली पारी – २२७/१०
भारत पहिली पारी – ३१४/१०

बांगलादेश दुसरी पारी -२३७/१०
भारत दुसरी पारी – १४५/७

हे ही वाचा:

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss