spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Team Indiaचा उपकर्णधार Shubman Gill ला ब्रेक, बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर? कारण काय…

टीम इंडियाचा उपकर्णधार शुभमन गिल (Shubman Gil)ला बांगलादेशविरुद्ध २ कसोटी सामन्यानंतर विश्रांती दिली जाऊ शकते. बांगलादेशविरुद्धच्या टी-२० संघातून त्याला बाहेर ठेवले जाऊ शकते.

भारतीय क्रिकेट संघ आता विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मैदानात खेळण्यास सज्ज झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया १९ सप्टेंबर पासून बांगलादेशविरुद्ध २ कसोटी सामने आणि ३, टी-२० सामने खेळताना दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार टीम इंडियाचा उपकर्णधार शुभमन गिल (Shubman Gill)ला बांगलादेशविरुद्ध २ कसोटी सामन्यानंतर विश्रांती दिली जाऊ शकते. बांगलादेशविरुद्धच्या टी-२० संघातून त्याला बाहेर ठेवले जाऊ शकते.

शुभमन गिल झिम्बाब्वेनंतर श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. यानंतर तो दुलीप ट्रॉफी २०२४ मध्येही खेळाला आणि आता कसोटी मालिकेत खेळणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे व्यवस्थापन शुभमन गिलला ब्रेक देऊ शकते. तसेच मिळालेल्या माहितीनुसार शुभमन गिल सोबतच जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यांनाही विश्रांती दिली जाऊ शकते.

टीम इंडियाचे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर ते आयपीएल (IPL) आणि देशांतर्गत क्रिकेट वर्षभर खेळात असतात. अशा स्थितीत विश्रांती न दिल्यास त्यांना दुखापत होण्याची शक्यता असते. या गोष्टी लक्षात घेऊन बीबीसीआय (BBCI) वरिष्ठ खेळाडूंना ब्रेक देण्याचा विचार करत आहे. रोहित आणि विराट टी-२० वर्ल्ड कपनंतर श्रीलंका दौऱ्यावर गेले होते. झिम्बाब्वे दौऱ्यावर ते टीम इंडियासोबत नव्हते. या दोघांनीही टी -२० मधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे त्यांना विश्रांती आहे.

टी-२० वर्ल्ड कप विजेतेपद पटकवल्यानंतर शुभमन गिलकडे झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघाची कमान सोपवण्यात आली होती. टीम इंडियाचा पुढचा कर्णधार म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जात आहे. टीम इंडियाला बांगलादेश विरुद्ध ७ ऑक्टोबर (दिल्ली), १० ऑक्टोबर (हैद्राबाद) सामने खेळायचे आहेत. भारतीय संघ १६ ऑक्टोबरला न्यूझीलंड विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार आहे. म्हणून संघातील सर्व खेळाडूंनी तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे.

हे ही वाचा:

सीबीटीसी यंत्रणेमुळे प्रवाशांना दिलासा; दर अडीच मिनिटांनी लोकल ट्रेन धावणार

गणपती विसर्जननिमित्त पुणे वाहतुकीत मोठे बदल, १७ रस्ते वाहतुकीस बंद

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss