तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर Team India जिंकली, CM Shinde यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव

तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर Team India जिंकली, CM Shinde यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव

भारतीय संघाने सेमी फायनलमध्ये इंग्लंडचा पराभव करत सलग सातव्यांदा विजय मिळवला आहे. टीम इंडिया (Team India) ने इंग्लंडला पराभूत करत T-20 वर्ल्ड कप सेमी फायनल (Semi Final) च्या पराभवाचा एका अर्थी बदलाच घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय संघाचे कौतुक केले आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे? 

आयसीसी टी२० क्रिकेट विश्वचषक २०२४ च्या उपांत्य फेरीत भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंड क्रिकेट संघाचा फडशा पाडत एकसंध भावनेतून तिरंगा फडकविला. सर्वप्रथम फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्माने फटकावलेले दमदार अर्धशतक तसेच सुर्यकुमार यादव (Surykumar Yadav), हार्दिक पांड्या (Hardik Pandya), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंड (England) संघासमोर १७१ धावांचे लक्ष ठेवले. इंग्लिश संघ हे लक्ष सहज पार करेल असे वाटत असताना फलंदाजीस उतरलेल्या इंग्लिश संघाच्या फलंदाजीस अक्षर पटेल (Axar Patel), कुलदीप यादव (Kuldeep Yadav), जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) यांनी सुरुंग लावला आणि टीम इंडियाने धडाकेबाज विजय मिळवत मोठ्या दिमाखात आयसीसी टी२० (ICC T 20) विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंचे मनापासून अभिनंदन तसेच पुढील अंतिम फेरीच्या सामन्याकरता हार्दिक शुभेच्छा, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय संघाचे कौतुक केले आहे.

कोण आहेत  टीम इंडियाचे खेळाडू?

टीम इंडियाच्या सामन्यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्षदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह हे खेळाडू असणार आहेत.

इंग्लडच्या टीममध्ये कोणते खेळाडू?

इंग्लंडच्या टीममध्ये जोस बटलर, फिलिप्स फिलिप सॉल्ट, जॉनी बेयरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, क्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रिस्ट टोपले हे खेळाडू समाविष्ट असणार आहेत.

Exit mobile version