spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भावूक पोस्ट शेअर करत टेनिसपटू सानिया मिर्झाने जाहीर केली निवृत्ती

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) हिने आता टेनिसला अलविदा केलं आहे. टेनिसपटू (Tennis Player) सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत (Shoeb Malik) तलाकच्या बातम्या चर्चेत असतानाच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

Sania Mirza Retirement : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) हिने आता टेनिसला अलविदा केलं आहे. टेनिसपटू (Tennis Player) सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत (Shoeb Malik) तलाकच्या बातम्या चर्चेत असतानाच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. सानियाने प्रोफेशनल टेनिस करिअरला गुडबाय करण्याचा निर्णय हा घेतला आहे. या संदर्भात सानियाने तिच्या सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

सानिया मिर्झा हि देशातील सर्वोत्कृष्ट महिला टेनिसपटू म्हणून ओळखली जाते. परंतु तिने आता प्रोफेशनल टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. या संर्भात एक भावूक पोस्ट तिने सोशल मिडीयावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेनंतर आपल्या मुलासोबत अधिक वेळ घालवणार असून यासाठी टेनिसमधून निवृत्ती घेणार असल्याचं एक पोस्ट शेअर करत दिली आहे. सानियाने तित्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अगदी भावनिक गोष्टी लिहिल्या आहेत. यावेळी ती ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेनंतर तिच्या मुलासोबत अधिक वेळ घालवण्यासाठी आणि त्याला आता माझी अधिक गरज असल्याचं सांगत निवृत्ती घेत आहे. तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे, ”३० वर्षांपूर्वी हैदराबादमधील एक सहा वर्षांची मुलगी पहिल्यांदा टेनिस कोर्टवर गेली, तिच्या आईसोबत गेली आणि प्रशिक्षकाने टेनिस कसे खेळायचे हे समजावून सांगितले. मला वाटत होते की मी टेनिस शिकण्यासाठी खूप लहान आहे. माझ्या स्वप्नांचा लढा वयाच्या सहाव्या वर्षीच सुरू झाला.” अशा आशयाची एक भलीमोठी पोस्ट लिहित सानियाने निवृत्ती जाहिर केली आहे. तसेच सानियाने तिच्या या पोस्टमध्ये बालपणीच्या फोटोंसह तरुणपणीचे फोटोही दिसून येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

 सानिया मिर्झा हि देशातील सर्वोत्कृष्ट महिला टेनिसपटू म्हणून ओळखली जाते. सानियाच्या नावावर सहा ग्रँड स्लॅम दुहेरी खिताब आहेत आणि ती या महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तिच्या अंतिम स्पर्धेत भाग घेईल, जिथे तिने २०१६ मध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकले. तसेच WTA वेबसाइटशी बोलताना भारतीय टेनिस स्टारने यासंबंधीची घोषणा केली. फेब्रुवारी महिन्यात दुबईत होणारा WTA1000 इव्हेंट ही तिच्या करिअरमधली शेवटची स्पर्धा असेल. तेव्हा दुबई टेनिस चँपियनशिपमध्ये तिचा खेळ चाहत्यांना पाहता येईल. तसेच फक्त ३६ वर्षीय असणारी सानिया मिर्झा ही दुहेरीत जागतिक क्रमवारीत नंबर १ वर राहिली आहे. सानिया मिर्झाने आतापर्यंत अर्जुन पुरस्कार (२००४), पद्मश्री पुरस्कार (२००६), राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (२०१५) आणि पद्मभूषण पुरस्कार (२०१६) ने देखील सन्मानित करण्यात आले आहे. सानियाने आतापर्यंत ६ मोठ्या चॅम्पियनशिपमध्ये पदके जिंकली आहेत.

 

हे ही वाचा:

Hockey World Cup 2023 ऑस्ट्रेलियाने फ्रान्सचा ८-० तर अर्जेंटिनाने दक्षिण आफ्रिकेचा १-० असा केला पराभव

विश्वासघात कोणी केला? राधाकृष्ण विखेपाटील यांचा नाना पटोलेंना सवाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss