भारतीय स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाआणि माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक हे क्रीडा विश्वातील सर्वांत लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. मात्र हे जोडपं विभक्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. सानिया आणि शोएब अनेक ठिकाणी एकत्र दिसतात, दोघेही एकमेकांसह मुलाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यामुळे त्यांच्यात सर्वकाही आलबेल आहे, असं दिसत होतं; पण अचानक सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या विभक्त होण्याच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरू लागल्या याच कारण म्हणजे सानिया मिर्झानं एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे नेटकरी आता प्रश्नात पडले आहेत.
Watch Video : मुलीच्या जन्मानंतर रणबीर कपूर हॉस्पिटलबाहेर दिसला
शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटावर आता तिनं एक पोस्ट शेयर करुन आपल्या आयुष्यात काही आलबेल नसल्याचे म्हटले आहे. तिनं तिच्या इंस्टावरुन एक पोस्ट शेयर करत ज्यांची मनं आता तुटली आहेत ते सगळे कुठे जातात, यासगळ्यांच्या समस्यांवर अल्लाहच मदत करेल. असे सानियानं म्हटले आहे. अशी पोस्ट करताच सानियाला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ते सगळेजण देवालाच शोधायला निघाले आहेत. असे सानियानं म्हटले आहे.
Sania Mirza’s Latest Insta Story pic.twitter.com/aM26zbs76W
— Vikash Gaur 🇮🇳 (@thevikashgaur) November 8, 2022
हेही वाचा :
अब्दुल सत्तरांनंतर रामदास कदमांची जीभ घसरली; अनिल परब यांच्या विरोधात खालच्या भाषेत टीका
त्या पोस्टपासुन सानिया आणि शोएब मलिकच्या आयुष्यात काही चांगलं चाललं नसल्याचे नेटकरी म्हणू लागले आहेत. यावरुन सानियाला तिच्या चाहत्यांनी देखील चांगलेच सुनावले आहे. भारत पाकिस्तान यामुळे ती पुन्हा ट्रोल देखील होऊ लागली आहे. दहा वर्षांहून अधिक काळ त्यांच्या वैवाहिक आयुष्याला झाला आहे. त्या दरम्यान पहिल्यांदाच त्यांच्यातील बेबनावाच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे तिनं शेयर केलेल्या पोस्टवरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, सानिया आणि शोएब यांची लव्ह स्टोरी आणि लग्न फार चर्चेचा विषय ठरलं होतं. मुख्य म्हणजे दोघांनीही लग्नबंधनात अडकण्यापूर्वी त्यांच्या आधीच्या पार्टनरशी संबंध तोडले होते. शोएब त्याची पूर्वीश्रमीची पत्नी आयेशा सिद्दीकीपासून विभक्त झाला होता. तर, सानियाने सोहराब मिर्झासोबत साखरपुडा केल्यानंतर लग्न मोडलं होतं. सानिया आणि शोएब यांनी १२ एप्रिल २०१० रोजी लग्न केलं. त्यानंतर, ३० ऑक्टोबर २०१८ रोजी सानियाने एका मुलाला जन्म दिला आणि त्याचं नाव इझान मिर्झा मलिक असं ठेवलं.
Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत काँग्रेसच्या कट्टर कार्यकर्त्याचे निधन