आज रंगणार ‘करो या मरो’ मुकाबला

अफगाणिस्तान आणि भारतीय संघाने आशिया चषकाच्या सुपर ४ फेरीमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे आता उर्वरित चार संघामध्ये सुपर ४ मध्ये पोहचण्यासाठी चुरस वाढली आहे. आता

आज रंगणार ‘करो या मरो’ मुकाबला

अफगाणिस्तान आणि भारतीय संघाने आशिया चषकाच्या सुपर ४ फेरीमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे आता उर्वरित चार संघामध्ये सुपर ४ मध्ये पोहचण्यासाठी चुरस वाढली आहे. आता श्रीलंका आणि बांगलादेश (Sri Lanka and Bangladesh) , पाकिस्तान आणि हाँगकाँग (Pakistan and Hong Kong) यांच्यातील सामना करो या मरो असा झालाय. आज आशिया चषकात बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यामध्ये करो या मरो असा सामना होणार आहे.

बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यामध्ये दुबई इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियममध्ये सामना होणार आहे. या खेळपट्टीवर आताच सामना झाला आहे, त्यामुळे खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. आशिया कप २०२२ (Asia Cup 2022) मध्ये ग्रुप ब मध्ये बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या तीन संघाचा समावेश आहे. अफगाणिस्तान संघाने श्रीलंका आणि बांगलादेशचा पराभव करत सुपर ४ फेरीत स्थान पक्कं केलं आहे. अफगाणिस्ताननं श्रीलंकाविरोधात एकतर्फी विजय मिळवला होता तर बांगलादेशविरोधात त्यांना टक्कर मिळाली होती. आज बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यामध्ये लढत होणार आहे. विजेता संघ सुपर ४ साठी पात्र ठरणार आहे तर पराभूत संघाचं पॅकअप होणार आहे.

बांगलादेशचा संघ –
शाकिब अल हसन (कर्णधार), अनामुल हक, मुशफिकुर रहीम, अफिफ हुसैन, मोसादेक हुसैन, महमूदुल्लाह, महेदी हसन, मोहम्मद सैफुद्दीन, मुस्तफिजुर रहमान, नसुम अहमद, सब्बीर रहमान, मेहदी हसन मिराज, तस्कीन अहमद, एबादोट हुसैन, परवेज हुसैन एमोन, मोहम्मद नईम.

श्रीलंकेचा संघ –
दसुन शनाका (कर्णधार), दनुष्का गुणथिलका, पथुम निसंका, कुसल मेंडिस, चरित असलंका, भानुका राजपक्षे, आशेन बंडारा, धनंजया डी सिल्वा, वानंदु हसरंगा, महेश थीक्षणा, जेफरी वेंडरसे, प्रवीण जयविक्रमा, चमिका करुणारत्ने, दिलशान पथिराना, नुवानीडु फर्नांडो, नुवान तुषारा, दिनेश चांदीमल.

बांगलादेश आणि श्रीलंका दोन्ही संघ कमकुवत आहेत. गेल्या काही दिवसांतील दोन्ही संघाची कामगिरी खराब राहिली आहे. बांगलादेश संघाला मागील १६ टी २० सामन्यापैकी १४ मध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय. तर श्रीलंका संघाला मागील १४ टी २० सामन्यात १० पराभवाचा सामना करावा लागलाय. दरम्यान, श्रीलंका आणि बांगलादेश संघ टी २० मध्ये आतापर्यंत १२ वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये श्रीलंका ८ तर बांगलादेश चार वेळा जिंकलाय. पण मागील तीन सामन्याचा विचार करता बांगलादेशनं दोन सामन्यात बाजी मारली आहे तर श्रीलंका संघाला फक्त एक विजय मिळवता आला.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतले सहपरिवार मुंबईच्या राजाचे दर्शन

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version