India vs South Africa: केरळच्या ग्रीनफिल्ड मैदानात रंगणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना

India vs South Africa: केरळच्या ग्रीनफिल्ड मैदानात रंगणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील भारत दौऱ्यातील मालिकेला तिरुअनंतपुरम येथून सुरुवात होणार असून भारतीय संघ २८ तारखेला म्हणजेच आज दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करणार आहे. मालिकेतील पहिला सामना तिरुवनंतपुरममधील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली टी-२० मॅच भारतीय वेळेनुसार रात्री ७ वाजता सुरू होईल. यांच्यातील पहिली टी-२० मॅचचा टॉस रात्री ६.३० वाजता होईल.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली टी-२० मॅच लाइव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. भारतीय संघ (team india) दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध टी२० मालिका (India vs South Africa) खेळण्यासाठी मैदानात उतरत आहे. तीन सामन्यांटच्या टी२० मालिकेला केरळच्या तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये (Greenfield Stadium) आज अर्थात २८ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. दरम्यान पहिला सामना जिंकणारा संघ मालिकेत आघाडी घेणार असल्यामुळे दोन्ही संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असेल. तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय मैदानावर मोठी धावसंख्या उभारल्याचं अजून दिसून आलेलं नाही. याठिकाणी पहिल्या डावात होणारी सरासरी धावसंख्या ११८ आहे तर दुसऱ्या डावाची सरासरी धावसंख्या ११७ आहे. विशेष म्हणजे ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आतापर्यंत फक्त दोन टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळवले गेले आहेत. एका सामन्यात दोन्ही संघांनी १७०+ खेळी केल्या असून दुसऱ्या सामन्यात मात्र पावसाचा व्यत्यय आल्याचं दिसून आलं आहे. ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियममध्ये हवामान चांगलं असणार आहे, ना खूप उष्ण आहे ना थंड आहे. इथे हवेत आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहे, पण वाऱ्यामुळे चेंडू इतका घसरत नाही.पावसाची फारशी शक्यता नाही पण ढगाळ वातावरण राहील आणि रिमझिम पावसाची शक्यता आहे.

भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, शाहबाज अहमद.

दक्षिण आफ्रिकेचा संघ:

टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, रिसोबा, रिसोबा रुसो, तबरीझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स.

हे ही वाचा:

सहा जिल्ह्याला एक पालकमंत्री म्हणजे ते काय ‘स्पायडरमॅन’ आहेत का ?, नाना पाटोलेंचं व्यक्तव्य

टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत, जाणून घ्या मौनी रॉयची कहाणी 

Follow Us

 

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version