spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दुबईमध्ये आज आयपीएलचा लिलाव पार पडणार

दुबईमध्ये आज आयपीएलचा लिलाव पार पडणार आहे. या लिलावात पहिल्यांदाच एखाद्या संघाचा विद्यमान कर्णधार उपस्थित राहणार आहे.

दुबईमध्ये आज आयपीएलचा लिलाव पार पडणार आहे. या लिलावात पहिल्यांदाच एखाद्या संघाचा विद्यमान कर्णधार उपस्थित राहणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत लिलावात पहिल्यांदाच उपस्थित राहणार आहे. ऋषभ पंत दुबईमध्ये दाखल झालाय. दुबईच्या कोका कोला एरिनामध्ये होणाऱ्या लिलावात ऋषभ पंत सहभागी होणार आहे.

ऑक्शन प्लॅनिंगचा भाग राहणार पंत

ऋषभ पंत ऑक्शन टेबलवर हजर राहणार आहे. पंत दिल्लीचा कोच रिकी पाँटिंग याच्यासोबत ऑक्शन हॉलमध्ये दिसेल. ऑक्शन हॉलमध्ये पंत हजर राहणार, याबाबतची माहिती दिल्लीच्या फ्रेचांयझीकडून देण्यात आली आहे. त्याशिवाय आयपीएल २०२४ मध्ये ऋषभ पंत दिल्लीच्या संघाची कमान संभाळणार असल्याचेही त्या सदस्याने सांगितले आहे. एनसीएमध्ये पंतने आपल्या फिटनेसवर काम केलेय. फलंदाजी आणि विकेटकिपिंग करतानाचे पंतचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

पंत काय म्हणाला ?

भीषण अपघातामधून वाचलो, हे माझं नशीबच होय. दुखापतीमधून सावरण्यासाठी खूप मोठा कालावधी गेलाय. अपघात झाला तेव्हा प्रचंड वेदनांचा सामना केला. सध्या परिस्थिती ठिक आहे, असे ऋषभ पंत म्हणाला आहे.

ऑक्शन हॉलमध्ये दिसणार दिग्गज –

आयपीएलच्या मिनी लिलावासाठी दहा संघाचे सदस्य दुबईमध्ये पोहचले आहेत. यंदा लिलावाच्या टेबलवर अनेक मोठे चेहरे दिसतील. यामध्ये भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर याचाही समावेश आहे. गौतम गंभीर कोलकात्यासाठी ऑक्शन टेबलवर हजर असेल. त्याशिवाय मुंबई इंडियन्सकडून आकाश अंबानी, पंजाब किंग्सकडून नेस वाडिया, कोलाकात्याकडून जय महता आणि इतर संघाचे मालक, सदस्यही ऑक्शन टेबलवर दिसनार आहेत .

आयपीएल लिलावात पहिल्यांदाच एखादा कर्णधार सहभागी होतोय. याआधी कोणत्याही संघाने लिलावासाठी कर्णधाराला पाठवलं नाही. २००८ मध्ये आयपीएलला सुरुवात झाली, तेव्हापासून एकाही संघाकडून कर्णधार ऑक्शन टेबलवर उपस्थित नव्हता. पहिल्यांदाच एखादा कर्णधार लिलावासाठी उपस्थित राहणार आहे. ऋषभ पंत याच्यासोबत दिल्लीचा कोच रिकी पाँटिंगही हजर असणार आहे

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss