spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IPL 2023 Auction IPL लिलाव 23 डिसेंबरला होणार, जाणून घ्या ‘या’ बड्या खेळाडूंची मूळ किंमत

चाहत्यांनी यावर्षी अनेक मोठ्या स्पर्धांचा आनंद लुटला. पण आता या थरारक वर्षाचा शेवट झाला आहे. तथापि, लोक अजूनही उत्साहित आहेत कारण इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) काही महिन्यांनंतर सुरू होणार आहे. त्यापूर्वी 23 डिसेंबर रोजी आगामी हंगामासाठी मिनी लिलाव आयोजित करण्यात आला आहे. ज्यामध्ये सर्व फ्रँचायझी त्यांच्या उरलेल्या पर्ससह त्यांचे कॅम्प मजबूत करण्याचा विचार करत असतील. या लिलावात आयपीएलमधील काही हटके खेळाडूही पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा : 

FIFA World Cup 2022 च्या समारोप समारंभात नोरा फतेही चमकली, दमदार परफॉर्मन्सने केले चाहत्यांना थक्क

यावेळी जगभरातून 991 खेळाडूंनी नोंदणी केली होती. मात्र अंतिम यादीत 405 खेळाडू आहेत. या 405 खेळाडूंपैकी 273 भारतीय तर 132 परदेशी आहेत. चार खेळाडू असोसिएट्स देशांचे आहेत. यादीत, 119 खेळाडू कॅप केलेले आहेत आणि 282 खेळाडू अनकॅप्ड आहेत. आयपीएल 2023 साठी 87 स्लॉट रिक्त आहेत ज्यासाठी या खेळाडूंचा लिलाव केला जाईल. इंडियन प्रीमियर लीग 2023 साठी लिलाव 23 डिसेंबर रोजी भारतीय वेळेनुसार 2.30 मिनिटांनी सुरू होईल. या 405 क्रिकेटर्सपैकी काही मोठ्या खेळाडूंच्या बेस प्राईसबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो.

आयपीएल 2023 च्या लिलावात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांची मूळ किंमत (IPL 2023 Auction) 2 कोटी रुपये आहे. रिले रॉसौ, केन विल्यमसन, सॅम कुरन, कॅमेरॉन ग्रीन, जेसन होल्डर, बेन स्टोक्स, टॉम बॅंटन, निकोलस पूरन, ख्रिस जॉर्डन, अॅडम मिल्ने, आदिल रशीद, ट्रॅव्हिस हेड, रॅसी व्हॅन डर डसेन, जिमी नीशम, ख्रिस लिन, जेमी ओव्हरटन आणि टायमल मिल्ससारख्या खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे.

मुख्यमंत्री खोक्याच्या माध्यमातून लोकशाही विकत घ्यायला निघाले आहेत का?, नाना पटोले

इंडियन प्रीमियर लीगसाठी जगभरातील अनेक खेळाडूंनी त्यांची मूळ किंमत 150 कोटी रुपये ठेवली आहे. हॅरी ब्रूक, शाकिब अल हसन, झ्ये रिचर्डसन, अॅडम झाम्पा, विल जॅक, डेव्हिड मलान, शेरफेन रदरफोर्ड, रिले मेरेडिथ, जेसन रॉय, शॉन अॅबॉट आणि नॅथन कुल्टर-नाईल यांचा या यादीत समावेश आहे.

Latest Posts

Don't Miss