Asia Cup मध्ये सर्वात यशस्वी संघ, Team India

मोठ्या वादानंतर आता निर्णय झाला आहे आणि आशिया चषक (Asia Cup) श्रीलंका (Sri Lanka) आणि पाकिस्तानमध्ये (Pakistan) होणार आहे असे जाहीर करण्यात आले आहे.

Asia Cup मध्ये सर्वात यशस्वी संघ, Team India

मोठ्या वादानंतर आता निर्णय झाला आहे आणि आशिया चषक (Asia Cup) श्रीलंका (Sri Lanka) आणि पाकिस्तानमध्ये (Pakistan) होणार आहे असे जाहीर करण्यात आले आहे. आशिया चषकाचे चार सामने पाकिस्तानमध्ये तर उर्वरित नऊ सामने श्रीलंकामध्ये होणार आहेत. ३१ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर यादरम्यान आशिया चषक पाहायला मिळणार आहे. यावर्षी आशिया चषक हायब्रिड पद्धतीने होणार आहे. असे म्हंटले जाते की आशिया चषक म्हणजे विश्वचषकाची रंगीत तालीम. कारण त्यानंतर लगेचच दोन महिन्यामध्ये वनडे विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. यावर्षीच्या आशिया चषकावर कोण नाव कोरणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे

आशिया चषकमध्ये सर्वात यशस्वी संघ हा भारताचा संघ आहे. आशिया चषक स्पर्धेला १९८४ पासून सुरुवात झाली आहे. तेव्हापासून आतापर्यत आशिया चषक ही स्पर्धा १५ वेळा पार पडली आहे. टीम इंडिया आशिया चषकातील सर्वात यशस्वी संघ आहे. भारतानं आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच सात वेळा आशिया चषकाचा मान मिळवला आहे. आशिया चषकाचा मान मिळ्वण्यामध्ये पाकिस्तानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानला दोन वेळा आशिया चषक जिंकता आला आहे. भारताच्या संघाने १९८४, १९८८, १९९०, १९९५ भारताने आशिया चषकावर नाव कोरले आहे.

आशिया चषकावर श्रीलंकेने १९९७ मध्ये नाव कोरले आहे. पाकिस्तान संघाने २००० मध्ये पहिल्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. यावर्षीचा आशिया चषक एकदिवसीय पद्धतीने खेळवला जाणार आहे. भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर आशिया चषकापासून टीम इंडियात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. आशिया कप स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणार असून एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. यावेळी आशिया कप स्पर्धेच्या एका गटात भारत, पाकिस्तानसह नेपाळ हा संघ असेल. तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान दुसऱ्या गटात आहेत. यामध्ये एकूण १३ सामने खेळवले जाणार आहेत. आशिया कपमध्ये ६ सुपर ४ सामने होणार आहेत.

हे ही वाचा:

Ashadhi Wari 2023, मुक्ताबाईंच्या पालखीचा विसावा वाकवड येथे तर धंदेवाडीत नाथांच्या पालखीचे उभे रिंगण

Mumbai Police यांच्याकडून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस, खोके दिन, गद्दार दिन साजरा…

Ashadhi Ekadashi 2023, आजपासून निघणार आषाढी यात्रेसाठी देवाचा पलंग…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version