spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

India vs England 2nd Semifinal : दुसरा कोणता संघ फायनलमध्ये जाणार? आज भारत आणि इंग्लंडचा सामना कधी आणि कुठे पाहता येणार सामना?

T२० विश्वचषक २०२२ मध्ये, भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना आज खेळला जाईल. याआधी जुलैमध्ये हे दोन संघ भिडले होते, ज्यामध्ये भारतीय संघाने इंग्लंडला त्यांच्याच भूमीवर पराभूत केले होते. मात्र, गेल्या तीन महिन्यांत या संघांच्या खेळण्याच्या शैलीत आणि खेळाडूंच्या फॉर्ममध्ये बरेच बदल झाले आहेत. या दरम्यान हे संघ काही विभागात मजबूत तर काही ठिकाणी कमकुवत झाले आहेत. दरम्यान फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आजचा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी महत्त्वाचं असणार आहे.

आजच्या सामन्यामधून अंतिम सामन्यातील दुसरा दावेदार संघ कोण असेल हे स्पष्ट होणार आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला तुल्यबळ इंग्लंडचा अडथळा पार करावा लागणार आहे. भारत आणि इंग्लंड या जागतिक क्रिकेटमधील बलाढ्य संघांमध्ये एकहाती सामने जिंकवून देणाऱ्या खेळाडूंची संख्याही मोठी आहे. त्यामुळे दडपणाखाली, मोक्याच्या क्षणी जे खेळाडू आणि जो संघ सर्वोत्तम कामगिरी करेल, त्यांच्या विजयाची शक्यता अधिक असेल.

हेही वाचा : 

Sanjay Raut : तुरुंगातून बाहेर येताच राऊत घेणार राजकारणातील ‘किंगमेकर’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या नेत्याची भेट

कसा आहे आजवरचा इतिहास?

टी२० क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड संघ यांच्यात आतापर्यंत २२ टी-२० सामने खेळवले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारताचं पारडं काहीसं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारताने २२ पैकी १२ सामन्यात विजय मिळवलाय. तर, इंग्लंड संघाला १० सामने जिंकता आले आहेत.

कधी आणि कुठे पाहता येणार सामना?

अ‍ॅडलेड ओव्हल मैदानावर सुरु होणाऱ्या सामन्याचं थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजल्यापासून सुरु होणार आहे. स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या) वाहिन्यांवर या सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंडय़ा, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), यजुर्वेद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, दीपक हुडा.

Sanjay Raut : ‘फोनवर बोलताना उद्धव ठाकरेंच उर भरुन आला, मलाही भरुन आलं’, संजय राऊत भावुक

इंग्लंडचा संघ : जोस बटलर (कर्णधार/यष्टीरक्षक), अ‍ॅलेक्स हेल्स, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, हॅरी ब्रूक, फिल सॉल्ट, सॅम करन, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद, टायमल मिल्स, मार्क वूड.

Latest Posts

Don't Miss