spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ब्रिजभूषण प्रकरणी ५ सदस्यीय समिती स्थापन करण्याचे क्रीडा मंत्रालयाने दिले आदेश, मेरी कॉम असणार अध्यक्ष

या पाच सदस्यीय समितीमध्ये अनुभवी बॉक्सर मेरी कॉम, ऑलिम्पिक पदक विजेता योगेश्वर दत्त, त्रिपाठी मुरगंडे यांचा समावेश असेल.

भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने एक समिती स्थापन केली आहे . क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी ही माहिती दिली. या पाच सदस्यीय समितीमध्ये अनुभवी बॉक्सर मेरी कॉम, ऑलिम्पिक पदक विजेता योगेश्वर दत्त, त्रिपाठी मुरगंडे यांचा समावेश असेल. ठाकूर म्हणाले की, ही समिती भूषण यांच्यावरील सर्व आरोपांची पुढील एक महिना चौकशी करेल आणि तोपर्यंत WFI च्या दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवेल.

TOPS चे माजी सीईओ राजगोपाल आणि राधा श्रीमन हे देखील या समितीचे सदस्य असतील. राधा या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) माजी ईडी होत्या. मुरगंडे हे मिशन ऑलिम्पिक समितीचा भाग आहेत. याआधी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (IOA) भूषण यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी सात सदस्यीय समितीही स्थापन केली होती आणि या समितीमध्ये योगेश्वर यांचाही समावेश आहे.

देशातील दिग्गज कुस्तीपटूंनी राष्ट्रीय राजधानीतील जंतरमंतर येथे भूषण यांच्याविरोधात तीन दिवस निदर्शने केली. या खेळाडूंमध्ये विनेश फोगटशिवाय ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया, रवी दहिया आणि साक्षी मलिक यांचा समावेश होता. या खेळाडूंनी डब्ल्यूएफआय तात्काळ बरखास्त करून भूषण यांना त्यांच्या पदावरून हटवावे, अशी मागणी केली. या सर्वांनी यासंदर्भात आयओएला पत्रही लिहिले होते. या खेळाडूंनी क्रीडामंत्र्यांसोबत दोनवेळा बैठकाही घेतल्या होत्या आणि दुसऱ्या बैठकीनंतर त्यांची पिकेटिंग संपवण्याची घोषणा केली होती.

दरम्यान , ब्रिजभूषण यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला होता. लैंगिक शोषणाचे आरोप सिद्ध झाल्यास आपण स्वत:ला फाशी लावून घेऊ, असे त्यांनी सांगितले. त्याचवेळी त्यांनी आपल्यावरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे वर्णन त्यांनी केले होते. महासंघात जे नियम बनवले आहेत ते या खेळाडूंना पसंत पडत नाहीत आणि त्यामुळेच त्यांना हटवण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे ते म्हणाले होते. दरम्यान, देशातील अनेक कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांना पाठिंबा दिला होता. नरसिंग यादवने तर असे म्हटले होते की, रिओ ऑलिम्पिक-२०१६ दरम्यान त्यांच्यासोबत जे घडले तेच ब्रिजभूषणसोबत होत आहे.

हे ही वाचा:

२५ जानेवारीला सलमान खान चाहत्यांना देणार डबल गिफ्ट, मोठ्या पडद्यावर रिलीज होणार ‘किसी का भाई किसी की जान’ चा टीझर

मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राजीनामा देणार?, नरेंद्र मोदींना केली विनंती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss