आगामी T-२० चषकासाठी ‘या’ १५ खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता

सध्या IPL २०२४ चे वेड सगळ्यांना लागले आहे. जिकडे तिकडे क्रिकेटची चर्चा चालू आहे. क्रिकेटप्रेमीही आता सज्ज झालेले आहे. २६ मे रोजी इंडियन प्रीमिअर लीगचा १७ वा हंगाम संपन्न होत आहे पण यानंतर अवघ्या ५ दिवसात २०१४ चा आयसीसी टी-२० विश्वचषक सुरु होणार आहे.

आगामी T-२० चषकासाठी ‘या’ १५ खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता

सध्या IPL २०२४ चे वेड सगळ्यांना लागले आहे. जिकडे-तिकडे क्रिकेटची चर्चा चालू आहे. क्रिकेटप्रेमीही आता सज्ज झालेले आहे. २६ मे रोजी इंडियन प्रीमिअर लीगचा १७ वा हंगाम संपन्न होत आहे. पण यानंतर अवघ्या ५ दिवसात २०१४ चा आयसीसी टी-२० विश्वचषक सुरु होणार आहे. येणाऱ्या विश्वचषकात संघातून कुठल्या खेळाडूंना संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयपीएल २०२४ च्या सामन्यांवर ४ सदस्यांची निवड समिती लक्ष ठेवून आहे. थेट सामने पाहण्यासाठी ही समिती मैदानावरही पोहोचत असल्याची माहिती मिळते. ही निवड समिती लवकरच येणार्‍या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड करणार असून १५ खेळाडूंना ही संधी मिळणार असल्याने ते कोण असतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रोहित शर्मा, विराट कोहली, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, रिंकू सिंह, मोहम्मद सिराज, हर्षदीप सिंह, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, अर्षदीप सिंह हे सर्व जण मिळून टी-२० साठी संभाव्य संघ असू शकतात. याबरोबर के. एल. राहुल, मुकेश कुमार, रवी बिश्नोई, रियान पराग, अक्षर पटेल, मयंद यादव, ईशान किशन, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर या ही खेळाडूंचा विचार केला जाऊ शकतो. भारतीय संघाची निवड समिती आयपीएल २०२४ चा पहिला टप्पा संपल्यानंतर १५ खेळाडूंचा संघ जाहीर करेल.

युगांडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, बांगलादेश, स्कॉटलंड, आयर्लंड, अफगाणिस्तान, श्रीलंका, पापुआ न्यू गिनी, पाकिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, वेस्ट इंडिस, आणि अमेरिका, कॅनडा हे पात्र ठरलेले २० संघ आहेत. संघांची गटवार हि पुढील प्रमाणे असेल. अ गट – भारत, पाकिस्तान, अमेरिका, कॅनडा, आयर्लंड, ब गट मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, स्कॉटलंड, ओमान, नामिबिया असून क गटामध्ये न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा याचबरोबर दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश व नेदरलँड्स, नेपाळ हे ड गटामध्ये असणार आहे.

हे ही वाचा:

‘फकिरा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला, NANA PATEKAR सह झळकणार SAYAJI SHINDE    

उन्हाळ्याच्या लाटेची शक्यता हवामान विभागाने आधीच का नोंदवली नाही?, RAJ THACKERAY यांचा सवाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version