मोहमद शमीच्या जागेवर ‘या’ गोलंदाजाला मिळणार संधी

मोहमद शमीच्या जागेवर ‘या’ गोलंदाजाला मिळणार संधी

बांगलादेश विरुद्ध (Bangladesh) सुरू होणाऱ्या वनडे मालिकेआधी टीम इंडियाला (Team India) मोठा झटका बसला. संघातील जलद गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammed Shami) दुखापत झाली आहे. वनडे मालिकेच्या आधी एका सराव सत्रात शमीच्या खाद्याला दुखापत झाली. सध्या बेंगळुरू (Bangalore) येथील नॅशनल क्रिकेट अकादमीत बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमकडून शमीवर उपचार सुरू आहेत. या दुखापतीमुळे शमी आगामी वनडे मालिकेत खेळू शकणार नाही. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती.

बीसीसीआयने एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये शमीच्या जागी उमरान मलिक (Umran Malik) याला संधी देण्यात आल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे बांगलादेश दौऱ्यात मलिक कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. न्यूझिलंड दौऱ्यात त्याने चांगली कामगिरी केली आहे. टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यात तीन एकदिवसीय मालिका आणि कसोटी खेळणार आहे. कसोटी मालिकापर्यंत मोहम्मद शमीची जखम बरी होईल असं एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

मोहम्मद शमी वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे. मात्र तो बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत देखील खेळण्याची शक्यता कमी आहे. वनडे मालिकेनंतर १४ डिसेंबरपासून दोन्ही संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. कसोटी चॅम्पियनशिप फायनलच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला पुढील सर्व कसोटी जिंकाव्या लागणार आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यात ४ डिसेंबरपासून वनडे मालिका सुरू होत आहे. दुसरी मॅच ७ तर तिसरी १० डिसेंबर रोजी होईल. २०१५ साली भारताने याआधी अखेरचा बांगलादेश दौरा केला होता. तेव्हा वनडे मालिकेत भारताचा पराभव झाला होता.

भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी (जखमी), मोहम्मद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन.

हे ही वाचा : 

Apurva Agnihotri Shilpa Baby पोस्ट शेअर करत अपूर्व आणि शिल्पाने सांगितलं लेकीचं नाव, लग्नाच्या १८ वर्षानंतर झाले चिमुकल्या पावल्याचं आगमन

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मुलांसाठी खास कार्यक्रमांचे आयोजन

शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून आज पुन्हा एकदा भाजपवर निशाणा

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version