spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘या’ खेळाडूने सोडली गुजरात टायटन्सची साथ, फ्रँचायझीने ट्विटरद्वारे दिली माहिती

"तुमचा प्रवास अविस्मरणीय ठरला. भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा."

आयपीएल (IPL) फ्रेंचाइजी गुजरात टायटन्सने शनिवारी १७ सप्टेंबर रोजी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक मोठी माहिती शेअर केली. या माहितीवरून असा अंदाज लावला जात आहे की, आयपीएल २०२२ मध्ये संघाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा सलामीवीर शुभमन गिल याने फ्रँचायझी सोडली आहे. आयपीएलच्या शेवटच्या मोसमात संघाला चॅम्पियन बनवण्यात त्याचा मोलाचा वाटा होता, त्याने अनेक प्रसंगी चांगली सुरुवात केली. या मोसमात त्याने ४०० हून अधिक धावा केल्या. मात्र, या प्रकरणी अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.

गुजरात टायटन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून या निर्णयाची माहिती दिली. ट्विटमध्ये, फ्रँचायझीने गिलला टॅग केले आणि लिहिले, “तुमचा प्रवास अविस्मरणीय ठरला. भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.” हे लक्षात घेण्यासारखे आहे की गुजरात टायटन्सने आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या आधीच्या लिलावात हार्दिक पंड्या आणि रशीद खान यांच्यासह शुभमन गिलला तब्बल ८ कोटी रुपयांना सामील करून घेतले होते. गिलनेही फ्रँचायझीकडून हे ट्विट रिट्विट केले आणि त्यावर हृदयाच्या इमोजीसह उत्तरही दिले.

आयपीएल २०२२ मध्ये चांगली कामगिरी केली

शुभमन गिलने आयपीएल २०२२ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती आणि चार अर्धशतकेही झळकावली होती. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत त्याने १६ सामन्यांमध्ये ४८३ धावा केल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ९६ होती आणि सीजनमध्ये त्याचा स्ट्राइक रेट १३२.३३ आणि सरासरी ३४.५० होता. त्या सीजनमध्ये एवढ्या मोठ्या कामगिरीनंतर अचानक त्याचा हा निर्णय आश्चर्यकारक वाटतो. आता गिलची पुढची वाटचाल काय असेल हे पाहावे लागेल, पण ही खास ऑफर त्याने धुडकावून लावली तर पुढच्या सीजनमध्ये तो नक्कीच काही मोठी जबाबदारी पेलू शकतो.

Shubhman Gill
Shubhman Gill

शुभमनच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर अलीकडेच त्याला वेस्ट इंडिज मालिकेत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये परतण्याची संधी मिळाली. कॅरेबियन मालिकेनंतर झिम्बाब्वेमध्येही त्याने चांगली कामगिरी केली होती. दोन्ही मालिकेत त्याला बॅक टू बॅक प्लेअर ऑफ द सिरीज म्हणूनही गौरविण्यात आले. तथापि, तो अजूनही भारतासाठी त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय पदार्पणाची वाट पाहत आहे. त्याने ११ कसोटीत ५७९ धावा आणि ९ एकदिवसीय सामन्यात ४९९ धावा केल्या आहेत. याशिवाय ७४ आयपीएल सामन्यांमध्ये त्याच्या नावावर १९०० धावा आहेत.

हे ही वाचा:

७० वर्षांनंतर चित्ता पुन्हा भारतीय भूमीवर, पंतप्रधान मोदी म्हणाले…

ट्विट डिलीट केल्याप्रकरणी, सुप्रिया सुळेंना मनसेने लगावला टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss