spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारतीय संघात तीन मोठे बदल, हार्दिक-हुड्डा संघाबाहेर

भारतीय संघाला टी-२० विश्वचषकापूर्वी घरच्या मैदानावर दोन टी २० मालिका खेळायच्या आहेत. ऑस्ट्रेलियानंतर आता टीम इंडिया अफ्रिकाला हरवण्यासाठी सज्ज झाली आहे. ऑस्ट्रेलियाला २-१ ने पराभूत केल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेची पाळी आहे. २८ सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा सुरू होत आहे. ज्यामध्ये ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत. टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची ही शेवटची द्विपक्षीय मालिका असणार आहे.

भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) कोरोनावर मात करण्यास अपयशी ठरल्यानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतून बाहेर झाला आहे. तर, पाठिच्या दुखापतीमुळं दीपक हुडा (Deepak Hooda) या मालिकेला मुकणार आहे. याशिवाय, भारतीय संघ व्यवस्थापनानं हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) विश्रांती देण्याचा निर्णय घेतलाय.या मालिकेतून विश्रांती देण्यात आलेल्या हार्दिक पांड्याच्या जागी शाहबाज अहमद (Shahbaz Ahmed) संघात समावेश करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं म्हणजेच बीसीसीआयनं (BCCI) अद्याप अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बुधवारपासून तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहेत. पहिला सामना उद्या म्हणजेच २८ सप्टेंबरला तिरुअनंतपुरममध्ये होणार आहे. तर, दुसरा टी-२० सामना २ ऑक्टोबरला गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर आणि तिसरा टी-२० सामना ४ ऑक्टोबरला इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार, तिन्ही सामने संध्याकाळी सात वाजता सुरू होतील.

बदलानंतर भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), के.एल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आर अश्विन, युझवेंद्र चहल, शाहबाज अहमद, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

हे ही वाचा:

नवरात्रोत्सवानिमित्त भगर खाल्ल्याने १०० पेक्षा अधिक जणांना विषबाधा

यंदा संजय राऊत तुरुंगातच सोनं लुटणार !

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss