Pro Kabaddi 2022: प्रो कबड्डीचा आजपासून थरार, दबंग दिल्लीपुढे यू मुम्बाचे आव्हान

Pro Kabaddi 2022: प्रो कबड्डीचा आजपासून थरार, दबंग दिल्लीपुढे यू मुम्बाचे आव्हान

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामाला शुक्रवारपासून प्रारंभ होणार असून सलामीच्या लढतीत गतविजेत्या दबंग दिल्लीपुढे यू मुम्बाचे आव्हान असेल. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी चाहत्यांना तीन सामने पाहण्याची संधी मिळेल. हे सामने बंगळूरु येथील कांटीरवा इनडोअर स्टेडियममध्ये रंगणार आहे. यंदा बंगळूरु, पुणे आणि हैदराबाद या तीन ठिकाणी प्रो कबड्डी लीगचे सामने होणार आहे. तीन वर्षांच्या कालावधीनंतर स्टेडियममध्ये चाहत्यांना प्रवेश मिळणार असल्याने या हंगामाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

कंतीरवा बंदिस्त स्टेडियममध्ये गतविजेते दबंग दिल्ली आणि माजी विजेते यु मुम्बा यांच्यातील सामन्याने यंदाच्या प्रो कबड्डीचा श्रीगणेशा होणार आहे. पहिले तीन दिवस तीन-तीन सामने होणार आहेत. दिल्ली विरुद्ध मुंबई यांच्यानंतर बंगळूरू-तेलुगू आणि जयपूर-युपी योद्धा अशी मेजवानी आहे. स्पर्धेचा सुरुवातीचा टप्पा बंगळूरमध्ये पार पडल्यानंतर पुणे आणि हैदराबाद येथे सामने होणार आहेत. सामन्यांना सायंकाळी ७.३० पासून सुरुवात होणार आहे.

यंदाच्या हंगामासाठी उत्साह व्यक्त करताना दबंग दिल्लीचा कर्णधार नवीन कुमार म्हणाला, ‘‘आम्ही गतविजेते आहोत आणि यंदाही चांगल्या कामगिरीचा आम्हाला विश्वास आहे.’’ तसेच यू मुम्बाचा कर्णधार सुरिंदर सिंगनेही दर्जेदार कामगिरीचा विश्वास व्यक्त केला. ‘‘आमच्यासाठी जेतेपद मिळवणे अतिशय महत्त्वाचे आहे. आमच्या संघात युवा खेळाडूंचा भरणा असून आमची दुसरी फळीही भक्कम आहे. आम्ही एकावेळी एका सामन्याचा विचार करीत आहोत. चाहत्यांना आमच्याकडून खूप अपेक्षा असून त्या पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल,’’ असे सुरिंदरने सांगितले.

दबंग दिल्ली वि. यू मुम्बा वेळ : सायं. ७.३० वा., बंगळूरु बुल्स वि. तेलुगू टायटन्स वेळ : रात्री ८.३० वा, जयपूर पिंक पँथर्स वि. यूपी योद्धाजवेळ : रात्री ९.३० वा. थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, १ हिंदी.

हे ही वाचा:

NCB ची मोठी कारवाई! NCB कडून आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश; १२० कोटींचं मेफेड्रोन जप्त

Women’s Asia Cup INDW vs PAKW Live : पाकिस्तानने भारतापुढे ठेवले १३८ धावांचे आव्हान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version