आज रंगणार भारत – पाकिस्तान ‘महामुकाबला’

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सामना आज रंगणार आहे. जवळपास १० महिन्यानंतर हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.

आज रंगणार भारत – पाकिस्तान ‘महामुकाबला’

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सामना आज रंगणार आहे. जवळपास १० महिन्यानंतर हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. आशिया कप २०२२ (Asia Cup 2022) स्पर्धेला २७ ऑगस्ट रोजी सुरुवात झाली असून अफगाणिस्तानने पहिल्या सामन्यात श्रीलंकेला मात दिली. आता भारत आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध (IND vs PAK 2022) खेळणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ११ सप्टेंबर रोजी होणार आहे.

गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात भारत-पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला. मात्र, टी-२० फॉरमॅटमध्ये दोन्ही संघ मजबूत स्थितीत आहे. दरम्यान, आज भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडीयमवर हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स, डीडी स्पोर्ट्स या चॅनेलवर होणार आहे. तसेच डिझ्नी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे.

भारताचा संघातील खेळाडू –

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.

पाकिस्तानचा संघातील खेळाडू –

बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहनवाज दहानी, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन.

यापूर्वी २०२१ च्या T20 विश्वचषकात दोन्ही संघ एकमेकांना भिडले होते. मात्र तेव्हा झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला १० विकेट्सच्या फरकाने लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे आता नवा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ बाबर आझमच्या सेनेशी मागील पराभवाचा हिशेब बरोबर करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.

हे ही वाचा :-

जाणून घ्या कशी बनवायची गणेशोत्सव स्पेशल ‘ऋषींची भाजी’

जाणून घ्या कशी बनवायची गणेशोत्सव स्पेशल ‘ऋषींची भाजी’

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version