spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

टॉस श्रीलंकेच्या बाजूने, प्रथम फलंदाजीचा निर्णय

कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर (Kolkata’s Eden Gardens) झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका (Dasun Shanaka)) याने नाणेफेक (toss) जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मागील सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली असता एक मोठे लक्ष्य भारताने उभारलं, त्यामुळे श्रीलंकेकडून चांगली फलंदाजी होऊनही ते पराभूत झाले होते . त्यामुळे आज स्वत: आधी फलंदाजी करत एक मोठी धावसंख्या उभारण्याचा श्रीलंकेचा प्रयत्न असणार आहे. युझवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) जागी कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवले आहे.

भारत-श्रीलंका (India-Sri Lanka) यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारताने ६७ धावांनी पाहुण्या संघाचा पराभव केला. त्यामुळे टीम इंडियाकडे या मालिकेत १-० अशी आघाडी आली आहे. आजच्या सामन्यात दमदार कामगिरी करत दुसरा वनडे सामना आणि मालिका जिंकण्याचा टीम इंडियाचा उद्देश असेल.

तसंच आजची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असल्याने एक मोठी धावसंख्या श्रीलंका उभारु शकते. याशिवाय दोन्ही संघामध्ये आजच्या सामन्यासाठी काही बदल करण्यात आले आहेत. भारतीय संघात युजवेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादवला संधी दिली गेली आहे. तर श्रीलंकेच्या संघात दिलशान मदुशंकाच्या जागी लाहिरू कुमारा खेळत असून नुवानिडू फर्नांडो हा युवा खेळाडू पाथुम निसंकाच्या जागी संघात येऊन पदार्पण करत आहे.

भारताच्या संघामध्ये रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, उमरान मलिक खेळणार आहेत.

तर श्रीलंका संघामध्ये कुसल मेंडिस, अविष्का फर्नांडो, चारित असलांका, धनंजय डी सिल्वा, नुवानिदु फर्नांडो, दुसान शनाका (कॅप्टन), वानिंदु हसरंगा, चामिका करुणारत्ने, दुनिथ वेलेज, लाहिरू कुमारा, कसुन रजिता खेळणार आहे.

हे ही वाचा:

… तर आंबेडकर कोणासोबतच युती करू शकणार नाहीत, शिंदे गटाची प्रतिक्रिया

चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा गौप्यस्फोट, अमित देशमुख भाजपात प्रवेश करणार ?

गिरगावात झळकले तेजस ठाकरेंचं पोस्टर; आजची शांतता, उद्याचं वादळ, चर्चेला आले उधाण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss