मुंबई इंडियन्सच्या #onefamily मध्ये सामील होणार दोन नवे संघ

MI Emirates आणि MI Cape Town या नव्या संघांचं स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे

मुंबई इंडियन्सच्या #onefamily मध्ये सामील होणार दोन नवे संघ

MI Emirates आणि MI Cape Town

मुंबई:रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, मुंबई इंडियन्सच्या मालकांनी आज मुंबई इंडियन्स #OneFamily मध्ये सामील होणाऱ्या दोन नवीन फ्रँचायझींचे नाव आणि ब्रँड ओळख उघड केली. UAE च्या आंतरराष्ट्रीय लीग T20 मधील ‘MI Emirates’ आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका T20 लीगमधील ‘MI केप टाउन’ ही संघाची नावे आहेत.

‘MI Emirates’ आणि ‘MI Cape Town’ – ही नावे ते संघ ज्या विशिष्ट प्रदेशांवर आधारित त्यानुसार निवडण्यात आली आहेत. संघ, ‘MI Emirates’ किंवा “MY Emirates” आणि ‘MY केप टाउन’ अनुक्रमे, अमिराती आणि केपटाऊन या दोन्ही भागातील चाहत्यांसाठीचे संघ आहेत. या दोन नवीन संस्था मुंबई इंडियन्सची प्रतिष्ठितेत भर पाडून संघाला अजून एक नवी ओळख देऊ शकतील. #OneFamily च्या जागतिक विस्तारामुळे मुंबई इंडियन्सला फ्रँचायझी क्रिकेटमधील सर्वात प्रिय संघांपैकी एक बनण्यास मदत होईल.

नीता अंबानींकडून नव्या संघांचे स्वागत

यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या डायरेक्टर नीता अंबानी यांनी या दोन्ही संघांचं स्वागत केलं आहे. यावेळी त्या म्हणाल्या, “आमच्या एमआय फॅमिलीमध्ये आताच सामील झालेल्या MI Emirates आणि MI Cape Town या नव्या संघांचं स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. आमच्यासाठी एमआय हे क्रिकेटपेक्षाही खूप काही आहे. एमआय नेहमीच नवी स्वप्न पाहण्याची आणि आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन वाढवण्याची ताकद देतं. मला खात्री आहे की एमआय एमिरेट्स आणि एमआय केपटाऊन हे दोन्ही संघही एमआयचा क्रिकेटचा वारसा जगात आणखी उंचीवर नेतील.”

रिलायन्स इंडस्ट्रीजने क्रिकेट फ्रँचायझींच्या, भारतातील फुटबॉल लीग, सल्लागार आणि ऍथलीट टॅलेंट मॅनेजमेंट आणि उद्योगातील सर्वोत्तम पद्धती आणून क्रीडा इकोसिस्टम विकसित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ब्रँड ओळख उघड करण्याव्यतिरिक्त, दोन्ही संघ त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून लाईव्हदेखील गेले होते. दरम्यान यूएई टी20 लीग आणि दक्षिण आफ्रिकेतील ट्वेन्टी ट्वेन्टी लीग स्पर्धा पुढच्या वर्षी जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान खेळवण्यात येणार आहेत.

‘MI Emirates’ आणि ‘MI Cape Town’ नाव आणि लोगो रिव्हिल :

 

Exit mobile version