spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

वानखेडेवर उभारणार विजयी षट्काराचे विजय मेमोरियल

तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीने श्रीलंका संघाविरुद्ध विजयी षटकार ठोकला होता. आता त्यांच्या या षटकाराचा विशेष सन्मान दिला जाणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन ऍपेक्स कौन्सिलने विश्वचषक विजयाच्या स्मरणार्थ वानखेडे स्टेडियमवर विजय स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

२०११ च्या विश्वचषकात भारताच्या विजयाला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. टीम इंडियाने २ एप्रिल २०११ रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध फायनल जिंकली होती. तब्बल २८ वर्षांनंतर त्याने विश्वचषक जिंकला. शेवटचा विजय १९८३ मध्ये झाला होता. तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीने श्रीलंका संघाविरुद्ध विजयी षटकार ठोकला होता. आता त्यांच्या या षटकाराचा विशेष सन्मान दिला जाणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन ऍपेक्स कौन्सिलने विश्वचषक विजयाच्या स्मरणार्थ वानखेडे स्टेडियमवर विजय स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

खरं तर, मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) निर्णय घेतला आहे की धोनीचे षटकार ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी विजयाचे स्मारक बांधले जाईल. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, “MCA ऍपेक्स कौन्सिलने वानखेडे स्टेडियमवर (Wankhede stadium) वर २०११च्या विश्वचषक विजयाच्या स्मरणार्थ एक लहान विजय स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे.” हे स्मारक महेंद्रसिंग धोनीच्या ऐतिहासिक विजयी षटकाराच्या ठिकाणी ते बांधले जाईल. एमसीएचे (MCA)अध्यक्ष पुढे म्हणाले, आम्ही यासंदर्भात महेंद्रसिंग धोनीशी संपर्क साधणार आहोत आणि विजय स्मारकाच्या उद्घाटनासाठी महेंद्रसिंग धोनीकडे वेळ मागणार आहोत. तर सध्या IPL २०२३ चा सिझन चालू आजही तर येत्या ८ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai super kings) सामना रंगणार आहे. तर याच मुहूर्तावर महेंद्र सिंग धोनी मुंबईत येत आहे. आणि तेव्हाच त्याच्या हस्ते उद्घाटन होईल, अशी माहिती MCA ने दिली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात गौतम गंभीरच्या ९७ धावा आणि महेंद्रसिंग धोनीच्या नाबाद ९१ धावांच्या जोरावर टीम इंडियाने विजय मिळवला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ६ बाद २७४ धावा केल्या. तर भारताकडे २७५ धावांचा target करायचा होता. भारताचे ओपनिंग (opening batsman )बॅट्समन सेहवाग (०) आणि तेंडुलकर (१८)वानखेडे स्टेडियम वर उतरले आणि इंडिया इंडियाच्या नाऱ्या चालु झाल्या. आणि काही वेळेतच त्यांनी विकेट लवकर गमावल्या. यानंतर गौतम गंभीर, विराट कोहली यांच्यातील ८३ धावांच्या भागीदारीने भारताच्या संधी जिंकण्याची जिवंत ठेवली होती .त्यानंतर धोनी आणि युवराज (२१*)यांच्या जोडीने पाचव्या विकेटसाठी नाबाद ५४ धावांची भागीदारी केली, ज्यामुळे टीम इंडियाला २८ वर्षांतील पहिले विश्वचषक विजेतेपद मिळाले. धोनीने ७९ चेंडूत ९१ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्यामुळे त्याचा हा विश्व्विक्रम चांगलाच लक्षात राहण्या जोग होता.

हे ही वाचा : 

IPL 2023 DC Vs GT, आज येणार दिल्ली आणि गुजरात आमने सामने, पांड्या विजयाचा पॅटर्न कायम ठेवणार?

संजय राऊतांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र

Weightlifter Sanjita Chanu ला डोप चाचणीत अपयश, चार वर्षांची घातली बंदी

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss