spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MS Dhoni चा हुक्का ओढतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल, नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट

आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार ‘हुक्का’ ओढताना दिसत आहे. त्यामुळे आता नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट दिसत आहे.

सर्वांचा लाडका खेळाडू महेंद्रसिंग धोनी हा क्रिकेटच्या मैदानावर त्याच्या धमाकेदार खेळीसाठी आणि त्याचबरोबर क्रिकेटच्या मैदानाबाहेर साधे जीवन सरळ जीवण जगण्यासाठी ओळखला जातो. जुलै महिन्यात धोनीने त्याच्या ४२ व वाढदिवस हा साजरा केला. त्यानंतर वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामध्ये पाळीव प्राण्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केल्याचे दिसत होते. त्यावेळी सर्वांनी माहीचे कौतुक केले. पण आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार ‘हुक्का’ ओढताना दिसत आहे. त्यामुळे आता नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट दिसत आहे.

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात तो हुक्का ओढताना दिसत आहे. या व्हिडिओने इंटरनेटवरील वातावरण गरम झाले आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, माजी भारतीय कर्णधार त्याच्या लांब केसांचा लूक असलेल्या सूटमध्ये दिसत आहे आणि त्याच्या आजूबाजूला काही लोकही दिसत आहेत. दरम्यान, सीएसकेचा कर्णधार हुक्का ओढताना दिसला. धोनीने आधी हुक्का तोंडात घातला आणि धूर आत घेतला आणि नंतर तो धूर बाहेर काढताना दिसला. धोनीच्या या व्हिडिओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. माहीसोबत काही लोक दिसले, तर अनेकांनी माजी भारतीय कर्णधाराला ट्रोल केले.

युजर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे तर काहींनी बचाव केला आहे. माही गेल्या काही दिवसांपासून दुबईमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. मात्र, त्याचा हुक्का ओढतानाचा ताज्या व्हिडिओने चाहत्यांना धक्काच बसला आहे. व्हिडिओमध्ये धोनी त्याच्या स्टाइलिश लांब केसांसह एक औपचारिक सूट परिधान केलेला दिसत आहे. त्याच्यासोबत इतर काही जणांचा गटही आहे. धोनीच्या तोंडातून धूर निघत आहे. चेन्नई सुपर किंग्सने गेल्या वर्षी झालेल्या आयपीएल २०२३ मध्ये विजेतेपद पटकावले होते. धोनीच्या नेतृत्वाखाली CSK संघ २०२३ मध्ये पाचव्यांदा IPL चॅम्पियन बनला. धोनीने संपूर्ण हंगामात संघासाठी काही शानदार फिनिशिंग इनिंग खेळल्या होत्या, ज्याने चाहत्यांचे खूप मनोरंजन केले. एमएस धोनीने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत २५० आयपीएल सामने खेळले आहेत, २१८ डावात फलंदाजी करताना त्याने ३८.७९ च्या सरासरीने आणि १३५.९२ च्या स्ट्राइक रेटने ५०८२ धावा केल्या आहेत. या काळात चेन्नईच्या कर्णधाराने २४ अर्धशतके झळकावली आहेत.

हे ही वाचा:

१२ जानेवारी रोजी PM Modi होणार नाशिकमध्ये दाखल, होणार भव्य रोड शो

सर्व कलांचा संगम असलेली रंगभूमी सर्वाधिक परिणामकारक माध्यम आहे – SHARAD PAWAR

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss