spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

T20 World Cup : विराट कोहली आणि इतर खेळाडू ऑस्ट्रेलियामध्ये चिल करताना, केला सुंदर फोटो शेअर

अवघ्या काही दिवसांवर टी-२० विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. तर, भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. संघाने येथे पहिला सराव सामना जिंकला आहे. पण पहिल्या सराव सामन्यात टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली मैदानात उतरला नाही. दुसऱ्या सराव सामन्यापूर्वी कोहली सहकारी खेळाडूंसोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता, ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तो हर्षल पटेल, दीपक हुडा आणि अक्षर पटेलसोबत दिसत आहे. हा फोटो शेअर करत विराटने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मुलांसोबत सुट्टीवर.’

हेही वाचा : 

Modi Cabinet : रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी मंत्रिमंडळाची दिवाळी भेट, ७८ दिवसांचे वेतन मंजूर केले

गेल्या महिन्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या आशिया चषकादरम्यान, कोहलीने त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७१ वे शतक झळकावले. त्याने शतकांचा तीन वर्षांचा दुष्काळ संपवला. पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवाननंतर कोहली आशिया चषकात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज होता.

यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही कोहलीने काही शानदार खेळी खेळल्या. कांगारूंविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याने 63 धावांची शानदार खेळी खेळली. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये त्याने नाबाद ४९ धावांची खेळी केली. कोहली सध्या संघासोबत पर्थमध्ये असून विश्वचषकाची तयारी करत आहे.

COVID-19: नव्या व्हेरियंटमुळे चीनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन

कोहलीचा ऑस्ट्रेलियामध्ये उत्कृष्ट रेकॉर्ड आहे आणि तो भारताचा १५ वर्षांचा T20 वर्ल्ड कप ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यास मदत करू शकतो.२००७ मध्ये भारताने शेवटचा टी-20 विश्वचषक जिंकला होता. कोहलीने गेल्या वर्षी त्याच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषक खेळला होता, पण टीम इंडिया सुपर-१२ फेरीतूनच बाद झाली होती. यावेळी संघाची कमान रोहित शर्माच्या हाती आहे.

यानंतर टीम इंडिया १७ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि १९ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध दोन टी-20 सराव सामने खेळणार आहे. भारतीय संघ २३ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.

Diwali 2022 : अगदी सोप्या पद्धतीत तुम्हला जमतील अशा खास मेहंदी डिझाइन्स

Latest Posts

Don't Miss