विराट कोहलीने आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध ७१वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले

विराट कोहलीनं ६१ चेंडूमध्ये १२२ धावांचा पाऊस पाडला.

विराट कोहलीने आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध ७१वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले

अफगाणिस्तानविरोधात विराट कोहलीनं वादळी शतकी खेळी केली. आशिया चषकात विराट कोहलीनं दमदार फलंदाजी केली. अफगाणिस्तानविरोधात प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीनं आक्रमक फलंदाजी करत शतकांचा दुष्काळ संपवला आहे. विराट कोहलीनं ५५ चेंडूत शतक झळकावलं. विराट कोहलीला मागील दोन ते अडीच वर्षात एकही शतक झळकावता आलेलं नव्हतं. त्यामुळे त्याच्यावर वारंवार टीका केली जात होती. पण तब्बल दोन वर्षानंतर विराट कोहली पुन्हा एकदा फॉर्ममध्ये परतला आहे. विराट कोहलीनं षटकार मारत शतक पूर्ण केलं.

आक्रमक फंलदाजी करत भारतीय संघाची धावसंख्या वाढवली. पहिल्यांदा राहुलसोबत भारतीय संघाची धावसंख्या वाढवली. त्यानंतर ऋषभ पंतसोबत त्यानं धावांचा पाऊस पाडला. विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर सोशल मीडियावर त्याचीच चर्चा सुरु झाली. विराट कोहलीला अनेकांनी शतक ठोकल्यानंतर शुभेच्छा दिल्या. सर्वसामान्यांपासून कलाकार आणि क्रिकेटपटूंनी विराट कोहलीच्या शतकानंतर ट्वीट केले आहेत. सोशल मीडियावर सध्या विराट कोहली ट्रेडिंग आहे.

विराट कोहलीनं आशिया चषकात एका शतकासह दोन अर्धशतकं झळकावत सर्वाधिक धावा काढणाऱ्या फंलदाजामध्ये स्थान पटकावलं आहे. विराट कोहलीनं पाकिस्तानविरोधात निर्णायाक ६० धावांची खेळी केली होती. त्यानंतर आता अफगाणिस्तानविरोधात विराट कोहलीनं शतक झळकावलं आहे. विराट कोहलीचं टी २० क्रिकेटमधील पहिलं शतक होय.

विराट कोहलीनं अफगाणिस्तान विरोधात वादळी शतकी खेळी केली. विराट कोहलीच्या नाबाद १२२ धावांच्या खेळीच्या बळावर भारतानं निर्धारित २० षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात २१२ धावांचा डोंगर उभा केला. विराट कोहलीनं ६१ चेंडूमध्ये १२२ धावांचा पाऊस पाडला. या खेळीदरम्यान विराट कोहलीनं सहा षटकार आणि १२ चौकारांचा पाऊस पाडला. विराट कोहलीशिवाय केएल राहुलनं अर्धशतकी खेळी केली.

हे ही वाचा:

ॲपल आयफोन १४ लॉन्च: आयफोन १२, आयफोन १३ च्या किंमतीत कपात; तर आयफोन ११ झाला बंद

थँक गॉडमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा एका सामान्य माणसाच्या तर अजय देवगण दिसणार चित्रगुप्ताच्या भूमिकेत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version