सूर्यकुमारच्या षटकारांच्या फटकेबाजीवर विराटने केला सलाम 

सूर्यकुमारच्या षटकारांच्या फटकेबाजीवर विराटने केला सलाम 

आशिया चषक ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत काल म्हणजेच बुधवारी (३१ ऑगस्ट २०२२) भारताने होंग कोंग वर 40 धावांचा मात करत सुपर चार मधील पहिले स्थान प्राप्त केले आहे. सूर्यकुमार यादव नबाद होता, त्याने ६८ धावा केल्या आणि विराट कोहली नबाद होता ५९ धावा करत अर्धशतकाच्या जोरावर भारताने हे विजय मिळवले आहे. प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादव ने केलेली खेळी पाहून विराट कोहलीने देखील त्याला सलाम केला चौदाव्या ओवर मध्ये मैदानात आलेल्या सूर्यकुमारने मैदानाच्या चारही बाजूला फटकेबाजी करत पुन्हा एकदा आपले कसब सिद्ध केले. सूर्यकुमार यादव ने २६ चेंडूत ६८ धावांची खेळी खेळली.

हेही वाचा : 

गोसेखुर्द धरणाच्या कालव्यात एक तरुण वाहून गेला तर, एकाचा मृतदेह सापडला

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ओव्हर प्ले मध्ये एक गडी गमावून ४४ धावा केल्या कर्णधार रोहित शर्मा आणि १३ चेंडूत २१ धावा करून झेलबाद केला. के एल राहुल ने अतिशय संत खेळी खेळत २९ चेंडू मध्ये ३६ धावा करून तो बाद झाला.

मात्र सूर्यकुमार आणि विराट या जोडीने अखेरच्या षटकापर्यंत फटकेबाजी केली मुंबईकर सूर्यकुमार ने मैदानाच्या चारही कोपऱ्यात पटकेबाजी केली विशेष म्हणजे सूर्य कुमारने मारलेल्या एकूण सहा षटकारांपैकी चार षटकार शेवटच्या शतकात मारले आणि आपले अर्धशतक पूर्ण केले सूर्यकुमार ची खेळी पाहून विराट कोहली त्याच्या समोर झुकत कौतुक केले. विराट कोहली ची ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर चांगलीच वायरल होत आहे.

पाकिस्तानातील पूर परिस्थितीवर भारताच्या पंतप्रधानांनी केलं मोठे व्यक्तव्य

Exit mobile version