Kohli आणि Dhoni च्या संदर्भामध्ये Virender Sehwag ने केले मोठे विधान

भारतामध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाची आज घोषणा करण्यात आली आहे. ५ ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे आणि भारताचा सामना ८ ऑक्टोबरला भारतीय संघाचा पहिला सामना रंगणार आहे.

Kohli आणि Dhoni च्या संदर्भामध्ये Virender Sehwag ने केले मोठे विधान

भारतामध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाची आज घोषणा करण्यात आली आहे. ५ ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे आणि भारताचा सामना ८ ऑक्टोबरला भारतीय संघाचा पहिला सामना रंगणार आहे. याचदरम्यान वेळापत्रकाच्या अनावरणाला भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग देखील उपस्थित होता. यावेळी हॉटस्टारशी बोलताना विरेंद्र सेहवाग याने विश्वचषकाच्या चार दावेदार संघ कोणते असू शकतात, याबाबत सांगितले आहे. त्याचबरोबर त्याने विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीबद्दलही भाष्य केले आहे.

यंदाचा वर्ल्ड कप विराट कोहलीसाठी जिंकायला हवा असे विधान वीरेंद्र सेहवाग याने केले आहे. भारताच्या संघाने प्रत्येकाने विराट कोहलीसाठी विश्वचषक जिंकायला हवा. विराट कोहली हा ग्रेट खेळाडू तर आहेच. त्याशिवाय तो चांगला माणूसही आहे. तो नेहमीच इतर खेळांडूना मदत करण्यासाठी पुढे येतो. विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्यामध्ये खूप समानता आहे. मोठ्या स्पर्धेत अथवा सामन्यात विराट कोहली इतरांपेक्षा जास्त चांगली कामगिरी करतो, असे विरेंद्र सेहवाग म्हणाला.


त्याचबरोबर धोनीबद्दल सेहवाग म्हणाला की, २०११ च्या विश्वचषक सामन्यादरम्यान एमएस धोनीने फक्त खिचडी खाल्ली होती. एखाद्या मोठ्या स्पर्धेवेळी प्रत्येकजण अंधश्रद्धाळू (superstitious)असतो.. धोनीनेही २०११ मध्ये फक्त खिचडी खाल्ली होती. वीरेंद्र सेहवाग याने यावेळी या वर्षीचा विश्वचषक जिंकू शकणाऱ्या चार संघाची निवड केली. हॉटस्टारशी बोलताना सेहवागने सेमीफायनलचे चार संघ निवडले. यामध्ये भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघाचा समावेश आहे.

हे ही वाचा:

आता ईडीमुळे सांगलीत देखील खळबळ, पाच व्यापारी ईडीच्या रडारवर

Sundar Pichai यांनी PM Modi यांच्या डिजिटल इंडियाचे केले कौतुक

अल-हकीम मशिदीला भेट देण्यापासून ते अल-सिसीला भेटण्यापर्यंत, जाणून घ्या पंतप्रधान मोदींचे वेळापत्रक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version