spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महिला भारतीय संघाने उडवला इंग्लंडचा धुव्वा

महिला भारतीय संघाने इंग्लंड विरोध दमदार अशी खेळी काल खेळली. भारतीय महिला संघाने लॉर्ड्सवरील तिसऱ्या वनडेत इंग्लंडचा १६ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारताने एकदिवसीय मालिकेत इंग्लिश संघाचा ३-० अशी दमदार खेळी खेळली. मात्र, एका विकेटमुळे या सामन्यात वाद उद्भवला. या सर्वांवर टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौरने मौन सोडेल आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने १६८ धावा केल्या. भारताच्या १६९ धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा संघ ४३.४ षटकात अवघ्या १५३ धावांवर गारद झाला.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. शेफाली वर्मा आणि यास्तिका भाटिया एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतल्या. मात्र, स्मृती मानधनाने ७९ चेंडूत ५० धावा केल्या. याशिवाय दीप्ती शर्माने नाबाद ६८ धावांचे योगदान दिले. भारतीय अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. हा सामना जिंकून भारतीय संघ झुलन गोस्वामीला संस्मरणीय निरोप देण्यात यशस्वी झाला. झुलन गोस्वामीने देखील शेवटच्या सामन्यात शानदार गोलंदाजी केली. तिने १० षटकांत ३० धावा देत दोन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. इंग्लंडला विजयासाठी १६ धावा करायच्या होत्या. शार्लोट डीन शेवटची फलंदाज फ्रेया डेव्हिससह संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करत होती. नॉन स्ट्रायकरच्या टोकाला उभी असलेली शार्लोट डीन त्या षटकातील चौथा चेंडू टाकण्यापूर्वीच क्रीझमधून बाहेर पडली. दीप्तीने चाणाक्षपणा दाखवत चेंडू फेकण्याऐवजी स्टंप उडवला.

सामन्यानंतर हरमनप्रीत कौरला या विकेट संदर्भात विचारण्यात आले. मात्र, ती उत्तर देण्यास टाळाटाळ करत होती. पण तिला त्या विकेटसंदर्भात पुन्हा प्रश्न विचारला असता. “आम्ही घेतलेल्या उर्वरित ९ विकेट्सबद्दल तुम्ही विचारलं नाही याचं मला आश्चर्य वाटतं. मुळात यावरून क्रिकेटपटू म्हणून आपण किती सतर्क आहोत, हे दिसून येतं. आम्ही कोणतीही चूक केली नाही.” अशा शब्दात कॅप्टन कौरने त्या विकेट वादावर सडेतोड उत्तर दिलं.

हे ही वाचा:

‘वर्षा’ सोडताना नवरीसारखं सोंग केलं; संदिपान भुमरेंची खोचक टीका

‘केंद्रातील चार मोठे प्रकल्प राज्यात….’, निर्मला सितारमन यांचा सवाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss