spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

India Vs Pakistan Live Streaming : T20 World Cup चा ‘महामुकाबाला’ कधी आणि कसा पाहायचा?, जाणून घ्या सविस्तर

T२० World Cup २०२२ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी मेलबर्न येथे सामना होणार आहे. या सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पण चाहत्यांसाठी एक वाईट बातमी म्हणजे सामन्यादरम्यान पाऊस खलनायक ठरू शकतो. सुपर-१२ टप्प्यातील या सामन्यात पावसाचा धोका आहे. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्यास षटके कापली जातील.

स्थानिक हवामान खात्यानुसार रविवारी ८० ते ९० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यादरम्यान एक ते पाच मिमी पाऊस अपेक्षित आहे. मेलबर्नमध्ये शुक्रवारी संध्याकाळीही मुसळधार पाऊस पडला आणि रविवारी जर असे झाले तर क्रिकेट चाहत्यांची निराशा होईल. मात्र, पाऊस पडला तरी त्याला सामोरे जाण्यासाठी या मैदानात सुविधा उपलब्ध असल्याचे स्थानिकांचे मत आहे.

Diwali bollywood party 2022 : बॉलिवूड कलाकारांची दिवाळी पार्टी, एकापेक्षा एक स्टायलिश लुकमध्ये अभिनेत्यांनी लावली हजेरी

गेल्या वर्षीच्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचा पाकिस्तानकडून एकतर्फी पराभव झाला होता. पाकिस्तानने हा सामना १० विकेटने जिंकून चाहत्यांची मनं मोडली. कोणत्याही फॉरमॅटच्या विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ होती. मात्र, यावेळी टीम इंडिया बदललेला कर्णधार, प्रशिक्षक आणि स्टाईलमध्ये दिसत आहे. अशा परिस्थितीत भारताने यावेळी त्या पराभवाचा बदला घ्यावा, असे चाहत्यांनाही वाटेल.

सामने केव्हा, कुठे आणि कसे पहायचे ते जाणून घ्या

T२० विश्वचषक-२०२२ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवार, २३ ऑक्टोबर रोजी सामना रंगणार आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील T२० विश्वचषक-२०२२ सामना मेलबर्नच्या मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील T२० विश्वचषक-२०२२ सामना दुपारी १.३० वाजता सुरू होईल, नाणेफेक दुपारी १ वाजता होईल.

टी-२० विश्वचषका आधी रोहित शर्माने घेतली पत्रकार परिषद; बी.सी.सी.आय विरुद्ध पी.सी.बी वादविवादावर त्याच्या पहिल्या प्रतिक्रियेत

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील T२० विश्वचषक-२०२२ सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर होईल.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील T२० विश्वचषक-२०२२सामन्याचे थेट प्रसारण डिस्ने हॉटस्टारवर होईल.

हेही वाचा : 

शिंदे, फडणवीस राज ठाकरे यांच्या मनात उद्धव ठाकरेंची दहशत – अंबादास दानवे

भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.

पाकिस्तान संघ – बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, शान मसूद, फखर जमान

Latest Posts

Don't Miss