spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत कोणते तीन खेळाडू भारतासाठी गेम चेंजर ठरतील? जाणून घ्या

टीम इंडिया आज सेमीफायनल खेळण्यासाठी मैदानात उतरत आहे, फायनल गाठण्यासाठी आज भारताला इंग्लंड संघाला मात द्यावी लागणार आहे. आजचा सामना जिंकणारा संघ थेट पाकिस्तानशी फायनलमध्ये दोन हात करेल. तर पराभूत संघाचं आव्हान इथेच संपणार आहे. भारतीय संघाने सुपर १२ फेरीतील ५ पैकी ४ सामने जिंकत सेमीफायनल गाठली आहे. तर इंग्लंड संघाने ५ पैकी ३ सामने जिंकले असून त्यांचा एक सामना अनिर्णीत सुटला होता. ज्यामुळे दोन्ही संघ कमाल फॉर्मात आहेत, अशामध्ये भारताने सुरुवातीपासून आपल्या प्लेईंग ११ मध्ये अधिक बदल केलेले नाहीत. केवळ एका सामन्यात अक्षरला विश्रांती देत दीपक हुडाला संधी दिली होती. तर नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात दिनेश कार्तिकला विश्रांती देऊन ऋषभ पंतला संधी दिली गेली होती. त्यानंतर आज संघात कोणते बदल होतील का अशी चर्चा असून मीडिया रिपोर्ट्समधून येणाऱ्या माहितीनुसार भारत झिम्बाब्वेविरुद्ध मैदानात उतरलेला संघच घेऊन आजही इंग्लंडचा सामना करणार आहे.

हेही वाचा : 

भारतीय क्रिकेट संघातील ‘या’ खेळाडूची पत्नी गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या वतीने लढणार

दोन्ही संघात एकापेक्षा एक स्टार खेळाडू आहेत. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला भारताच्या अशा ३ खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, तर या उपांत्य फेरीच्या सामन्यात ते गेम चेंजर बनू शकतात आणि हा सामना भारताच्या झोळीत टाकू शकतात.

विराट कोहली

कोहलीने टी-२० विश्वचषकात आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून ५ सामन्यात सर्वाधिक २४६ धावा केल्या आहेत. कोहलीने १२३ च्या अविश्वसनीय सरासरीने या धावा केल्या आहेत, त्याचा स्ट्राइक रेट देखील १४०च्या आसपास आहे. आतापर्यंत पाच डावांत कोहलीच्या बॅटमधून तीन अर्धशतके झाली आहेत. इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये कोहली मोठा गेम चेंजर ठरू शकतो.

‘हर हर महादेव’ चित्रपटाला विरोध करणाऱ्यांवर शरद पोंक्षे संतापले म्हणाले, पुरोगाम्यांची फालतूगिरी…

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादव टी२० विश्वचषक २०२२ मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये धावत आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ५ सामन्यात ३ अर्धशतके झळकावली आहेत. त्याचबरोबर त्याने वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत २२५ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी ७५ पेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर त्याने या विश्वचषकात १९३ पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत.

Janhvi Kapoor : जान्हवी कपूरने “सौदी अरेबिया” मधील खास फोटो शेअर केले

Latest Posts

Don't Miss