खेळ सुरु असतांना रोहित शर्माचा फॅन घुसला मैदानात; पुढे काय झालं ते वाचा

खेळ सुरु असतांना रोहित शर्माचा फॅन घुसला मैदानात; पुढे काय झालं ते वाचा

आपल्या आदर्श खेळाडूला भेटण्यासाठी ‘चाहते’ सर्व मर्यादा ओलांडतात असे क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा पाहायला मिळले आहे. टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामन्यादरम्यान एक भारतीय चाहता सुरक्षा भंग करताना रोहित शर्मापर्यंत पोहोचला. मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा ‘जबरा फॅन’ मैदानात उतरला, पण लाखो रुपयांचा दंड भरून त्याची भरपाई करावी लागेल हे त्याला माहीत नव्हते.

भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यात आज मेलबर्नच्या क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) टी-२० विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीतील अखेरचा सामना खेळला गेला. या सामन्यात भारतानं झिम्ब्बावेचा ७१ धावांनी पराभव करत आठ गुणांसह सेमीफायनलमध्ये धडक दिली. दरम्यान, भारत आणि झिम्बाब्बे यांच्यात १० नोव्हेंबरला टी-२० विश्वचषकाचा दुसरा सेमीफायनल खेळला जाणार आहे. यापूर्वी न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात सेमीफायनलची पहिली लढत होईल. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आज झालेल्या सामन्यात एक विचित्र घटना पाहायला मिळाली. भारत- झिम्बाब्वे यांच्यातील लाईव्ह सामन्यादरम्यान एक मुलगा रोहित शर्माला भेटण्यासाठी मैदानात आला, ज्याचा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

झिम्बाब्वेविरुद्ध सामन्यात भारतीय संघ गोलंदाजी करत असताना रोहित शर्माचा एक चाहता त्याला भेटण्यासाठी मैदानात शिरला. त्याच्या हातात तिरंगा असून त्यानं रोहित शर्माला भेटण्याची आशा व्यक्त केली. मात्र त्याआधीच मैदानावरील सुरक्षा रक्षकानं त्याला थांबवलं. सुरक्षा रक्षकांशी झालेल्या झटापटीत तो मुलगा खाली पडला. हे पाहताच रोहित शर्मानं त्याच्या दिशेनं धाव घेतली आणि सुरक्षा रक्षकाला त्याला घेऊन जाण्यास सांगितलं. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. लाईव्ह सामन्यात मैदानात शिरल्यामुळं या चाहत्याला ६.५ लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय, अशीही माहिती समोर आलीय.

हे ही वाचा :

गुजरातमध्ये पूर्वीचे सर्व विक्रम मोडायचे आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य

अजित पवारांची कुणालाही गॅरंटी नाही; नीलम गोरेंच विधान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version