spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

WI vs IND, 2nd ODI: हार्दिक, संजू आणि सूर्याही फ्लॉप, भारताचा सहा विकेट्सने पराभव..

दुसऱ्या एकदिवसीय (2nd ODI) सामन्यात वेस्ट इंडिजने (WI) भारताचा (IND) सहज पराभव केला. भारतीय संघाने दिलेले आव्हान (Target) वेस्ट इंडिजने चार विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या आक्रमणापुढे १८१ धावांवर संपुष्टात आला होता.

दुसऱ्या एकदिवसीय (2nd ODI) सामन्यात वेस्ट इंडिजने (WI) भारताचा (IND) सहज पराभव केला. भारतीय संघाने दिलेले आव्हान (Target) वेस्ट इंडिजने चार विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या आक्रमणापुढे १८१ धावांवर संपुष्टात आला होता. प्रत्युत्तरदाखल वेस्ट इंडिजने हे आव्हान सहा विकेट राखून सहज पार केले. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होप (Shai Hope) याने कर्णधारपदाला साजेशी ६३ धावांची खेळी केली. या विजयासह वेस्ट इंडिजने तीन सामन्याच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली.

भारतीय संघाने दिलेल्या १८२ धावांचे आव्हान वेस्ट इंडिजने ३६.४ षटकात (over) चार विकेटच्या मोबदल्यात पार केले. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने दमदार सुरुवात केली. ब्रँडन किंग (Brandon King) आणि कायल मायर्स (Kyle Myers) यांनी संयमी आणि दमदार सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी ५३ धावांची भागिदारी केली. ब्रँडन किंग याला शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) याने १५ धावांवर बाद केले. या खेळीत ब्रँडन किंग याने तीन चौकार लगावले. एथनाजे (Athanaze) याला मोठी खेळी करता आली नाही, तो फक्त सहा धावांवर बाद झाला. कायल मायर्स याने चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३६ धावांचे योगदान दिेले. शिमरोन हेटमायर (Shimron Hetmyer) हा ९ धावांवर बाद झाला. काएसी कॅर्टी (Keacy Carty) याने नाबाद ४८ धावांची खेळी केली, तर कर्णधार शाय होप याने नाबाद ६३ धावांचे दमदार खेळी केली. शाय होप याने ८० चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ६३ धावा केल्या. कॅर्टी याने चार चौकाराच्या मदतीने ४८ धावांचे योगदान दिले. शाय होप आणि कॅर्टी यांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद ९१ धावांची भागिदारी केली. भारताकडून शार्दूल ठाकूर सर्वात यशस्वी गोलंदाज (Bowler) राहिला. शार्दूल ठाकूर याने तीन फलंदाजांना तंबूत धाडले. कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याने एक विकेट घेतली. हार्दिक पांड्या (Hardik Pandya), मुकेश कुमार (Mukesh Kumar), उमरान मलिक (Umran Malik), रविंद्र जाडेजा (Ravindra Jadeja) आणि अक्षर पटेल (Axar Patel) यांना एकही विकेट मिळाली नाही.

भारतीय संघाने ४०.५ षटकात १८१ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून ईशान किशन (Ishan Kishan) याने ५५ धावांची खेळी केली. त्याशिवाय शुभमन गिल (Shubman Gill) याने ३४ धावांचे योगदान दिले. या दोघांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला ३० धावसंख्या ओलांडता आली नाही. वेस्ट इंडिजकडून मोटी (Motie) आणि शेफर्ड (Shepherd) यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट घेतल्या. शेफर्डने ८ षटकात ३७ धावा दिल्या. मोटीने ९.५ षटकात ३६ धावा दिल्या. जोसेफने २ बळी घेतले. यानिक (Yannic) आणि सील्सला (Seales) प्रत्येकी एक विकेट मिळाली. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि अनुभवी विराट कोहली (Virat Kohli) यांना आराम देण्यात आला होता. संजू सॅमसन (Sanju Samson) आणि अक्षर पटेल ((Axar Patel)) यांना संधी देण्यात आली. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होप याने नाणेफेक (coin toss) जिंकून टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. शुभमन गिल आणि ईशान किशन यांनी डावाची सुरुवात दमदार केली. पहिल्या विकेटसाठी या जोडीने ९० धावांची भागिदारी केली. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने २४ धावांची खेळी करत संघर्ष केला, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. ईशान किशन, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांच्याशिवाय एकाही फलंदालाजाला मोठी खेळी करता आली नाही. विराट कोहलीच्या जागी संघात स्थान मिळालेल्या संजू सॅमसन याने निराश केले. त्याने अवघ्या ९ धावा काढून तंबूत परतला. अक्षर पटेल याने एक धाव काढून बाद झाला. कर्णधार हार्दिक पांड्या सात धावांवर बाद झाला. रविंद्र जाडेजा १० धावांवर बाद झाला. शार्दूल ठाकूर याने १६ धावांचे योगदान दिले. कुलदीप यादव याने नाबाद आठ धावांची खेली केली. उमारन मलिक याला खातेही उघडता आले नाही. मुकेश कुमार याने सहा धावांचे योगदान दिले.

हे ही वाचा:

महसूल दिनानिमित राज्यात ‘महसूल सप्ताहाचे’ आयोजन, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहीती

Gulabjam 2, सोनाली कुलकर्णी सिद्धार्थ चांदेकरसोबत नाही तर दिसणार ‘या’ अभिनेत्यासोबत

रवी जाधव दिग्दर्शित ‘Taali’ चित्रपटाचा टीझर रीलीज, सुष्मिता सेन झळकणार किन्नरच्या भूमिकेत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss