spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Virat kohli birthday : विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त पत्नी अनुष्कानं मजेशीर पद्धतीने शुभेच्छा दिल्या

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याचा आज ३४ वा वाढदिवस. विराट कोहलीचा वाढदिवस कालपासून सोशल मीडियावर साजरा केला जात आहे. अनेक दिग्गजांनी विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर विराट कोहलीच्या चाहत्यांनी विराट कोहलीली ट्विटवर टॅग करीत अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर विराट कोहलीसाठी प्रिय असलेली व्यक्ती म्हणजे पत्नी अनुष्का शर्मा हिनं देखील विराट काही मजेशीर पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

हेही वाचा : 

Abdul Sattar : अब्दुल सत्तारांकडून आदित्य ठाकरेंचा ‘रणछोडदास’ म्हणून उल्लेख

अनुष्काने पती विराटला अशाप्रकारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

अनुष्का शर्माने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर विराट कोहलीच्या मजेशीर आणि विनोदी पोज मधील फोटोची मालिका पोस्ट केली आहे. या फोटोंमध्ये विराट कोहलीच्या चेहऱ्याचे भाव पाहण्यासारखे आहेत. फोटो पोस्ट करताना, अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुझा वाढदिवस माझे प्रेम आहे, त्यामुळे साहजिकच मी या पोस्टसाठी तुझा सर्वोत्तम फोटो निवडले आहेत. अनुष्काच्या या पोस्टना चाहत्यांनी भरभरून प्रतिकिया दिल्या आहेत. अनेकींनी विराटने अनुष्काच्या पोस्टवर हास्य इमोजी आणि अनेक हार्ट-साइड इमोटिकॉनसह आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Shalimar Express Fire : नाशिकरोड रेल्वे स्थानकावर शालिमार एक्सप्रेसला लागली आग

एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान दोघांची भेट झाली. कोहली आणि अनुष्का एका शॅम्पू ब्रँडची टीव्ही जाहिरातीचे शूटिंग करत होते. त्यानंतर दोघांची मैत्री झाली अन् मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर, अनुष्का आणि विराटने २०१७ मध्ये इटलीमध्ये एका इंटिमेट सेरेमनीमध्ये लग्न केले. या जोडप्याला एक लाडकी मुलगी वामिका आहे. अनुष्का सध्या तिच्या आगामी ‘चकडा एक्सप्रेस’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, तर विराट कोहली टी-२० वर्ल्ड कपमध्ये व्यस्त आहे. असे असूनही दोघेही नेहमी एकमेकांसाठी वेळ काढतात.

सुषमा अंधारे यांना रोखलं, उद्धव ठाकरे यांना कसं रोखणार?

Latest Posts

Don't Miss