spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारत पाकिस्तानच्या ‘या’ रेकॉर्डची बरोबरी करणार का ?

आज टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा टी-२० सामना बसेटेरे (सेंट किट्स) येथे खेळणार आहे.

बसेटेरे : आज टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा टी-२० सामना बसेटेरे (सेंट किट्स) येथे खेळणार आहे. वनडे मालिकेमध्ये ३-० अश्या मोठ्या पराभवानंतर शुक्रवारी रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांच्या तुफान फटकेबाजीच्या बळावर भारतीय संघाने टी-२० सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचा पराभव केला. या सामन्यांमध्ये विजय मिळवून टी-२० मालिकेमध्ये आघाडी घेण्याची संधी भारताकडे आहे. रोहित शर्माच्या संघाने वेस्ट इंडिजला आज पराभूत केले, तर त्यांना एका मोठ्या विक्रमाची बरोबरी करता येणार आहे.

यजमानांचा ट्रॅक रेकॉर्ड

बसेटेरेच्या मैदानावर टीम इंडिया पहिल्यांदा सामना खेळायला उतरणार आहे. याउलट वेस्ट इंडिज संघाचा येथील रेकॉर्ड चांगला आहे. सोबतच घरच्या मैदानावर खेळत असल्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. यजमान वेस्ट इंडिजने येथे १० टी-२० सामने खेळले आहेत. त्यातील ६ सामने ते जिंकले आहेत. २ सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला असून बाकी २ सामन्यांचे निकाल अनिर्णित राहिले आहेत.

पाकिस्तानचा विक्रमी ‘रेकॉर्ड’

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यांमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम सध्या पाकिस्तानच्या नावावर आहे. पाकिस्तानने वेस्ट इंडिज विरुद्ध २१ सामने खेळले आहेत. या २१ पैकी १५ सामन्यांमध्ये पाकिस्तानने त्यांना हरवले आहे. तर ३ सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचा संघ जिंकला असून उरलेले ३ सामने अनिर्णित राहिले आहेत.

भारताला बरोबरी करायची संधी ?

भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध एकूण २१ सामने खेळले असून त्यातील १४ सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळाला आहे. ६ सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजने भारताचा पराभव केला आहे. एका सामन्याचा निकाल लागला नसल्यामुळे भारत पाकिस्तानच्या मागे आहे. आजचा सामना जिंकल्यास भारतीय संघ टी-20 मालिकेमध्ये आघाडीवर असेल. त्याचबरोबर त्यांना वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक टी-20 सामने जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी देखील करता येईल. एकूणच एका दगडामध्ये दोन पक्षी मारायची संधी भारतीय संघाकडे आहे.

हेही वाचा : 

मुख्यमंत्री कोण?, उपमुख्यमंत्री कोण ? कळतही नाही, सेनेच्या फेवरेट पिचवर आदित्य ठाकरेंची फटकेबाजी 

Latest Posts

Don't Miss