Champions Trophy 2025 साठी भारत पाकीस्तानला जाणार ?

Champions Trophy 2025 साठी भारत पाकीस्तानला जाणार ?

Champions Trophy 2025 चे आयोजन हे भविष्यात पाकिस्तानमध्ये करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाने न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात अली आहे. हाती आलेल्या बातमीनुसार क्रिकेट नियामक मंडळ यासंदर्भात आयसीसीसोबत चर्चा करणार आहे. यावेळी चॅम्पियनस ट्रॉफीचे आयोजन हायब्रीड मॉडेल अंतर्गत होऊ शकते. भारतीय संघाचे सामने दुबई किंवा श्रीलंकेत आयोजित केले जाऊ शकतात. याआधी आशिया कपमध्येही असंच झालं होतं.   

वृत्तानुसार, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला जाण्याची शक्यता नाही. बीसीसीआय दुबई किंवा श्रीलंकेत सामने खेळवण्यासाठी आयसीसीसोबत चर्चा करेल. भारतीय संघांचे सामने दुबई आणि श्रीलंकेत तर इतर सामने पाकिस्तानमध्ये होण्याची शक्यता आहे. याआधी आशिया कपमध्येही असंच झालं होतं. भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकेत खेळले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघाचे खेळाडू पाकिस्तानला जाण्यासाठी तयार नाहीत. अद्याप यावर निर्णय झाला नसून चर्चा सुरू आहे. दरम्यान, गेल्या वर्षी झालेल्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ भारतात आला होता. त्यामुळे आता भारतीय संघ पाकिस्तानात जाण्याबाबत चर्चा होऊ शकते.

पाकिस्तानने नुकतंच चॅम्पियन्स ट्रॉफीचा ड्राफ्ट आयसीसीकडे सोपवला होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पूर्ण शेड्युलही तयार केलं होतं. यात भारत आणि पाकिस्तानचा सामना लाहोरमध्ये आयोजित केला जाणार होता. १ मार्चला दोन्ही संघात सामना खेळवला जाणार होता. पण भारतीय संघाने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यानं आता त्यांना शेड्युल बदलावं लागेल. पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारीही केली आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून मैदाने ठीक करण्याचाही त्यांचा प्लॅन आहे. पीसीबीने यासाठी काम सुरू केलं आहे. भारतीय संघ आणि पाकिस्तान ग्रुप ए मध्ये आहेत. न्यूझीलंड आणि बांगलादेशसुद्धा याच ग्रुपमध्ये असतील. तर बी ग्रुपमध्ये इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान असणार आहेत.

हे ही वाचा:

उत्तम अभिनयाबरोबरच Chaya Kadam यांची निर्मिती क्षेत्रात पदार्पण

MUKHYAMANTRI MAJHI LADKI BAHIN YOJANA: फॉर्म तर भरला पण पैसे कधी मिळणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

Exit mobile version