IND VS AUS च्या तिसऱ्या मालिकेमध्ये इंदोरचे मैदान ठरेल का भारतासाठी लकी?

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Border Gavaskar Trophy) तिसरा सामना सुरु व्हायला आठवडा भाराचा अवधी आहे आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघाच्या अडचणी कमी होत नाही

IND VS AUS च्या तिसऱ्या मालिकेमध्ये इंदोरचे मैदान ठरेल का भारतासाठी लकी?

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Border Gavaskar Trophy) तिसरा सामना सुरु व्हायला आठवडा भाराचा अवधी आहे आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघाच्या अडचणी कमी होत नाही आणि ऑस्ट्रेलिया संघाला एकामागून एक धक्के बसत आहेत त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाचा संघ बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे. ऑस्ट्रेलियासंघातील अनेक खेळाडू हे दुखापतीमुळे मालिकेमधून बाहेर पडत आहेत. त्यामुळे ऑट्रेलिया संघाच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. आणि हि बातमी इंदोर मध्ये १ मार्चपासून सुरु होणाऱ्या IND vs AUS च्या तिसरी कसोटी संबंधीत आहे.

भारताचा संघाला तिसऱ्या कसोटीआधी पहिल्या दोन सामन्यात जसा खेळ पाहायला मिळाला तसा खेळ भारताने खेळू नये अशी ऑस्ट्रेलियाची इच्छा नक्कीच असेल. तिसऱ्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाला दिल्ली आणि नागपूरसारख्या खेळपट्ट्या मिळाल्या तर ऑस्ट्रेलियाचा पराभव नक्की असेल. मागील दोन कसोटीमध्ये भारताच्या फिरकी जोडीने रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अडचणीत तर नक्कीच टाकले होते. स्टीव्ह स्मिथ(Steve Smith), मार्नस लाबूशेन (Marnus Labuschein) , डेव्हिड वॉर्नर (David Warner) यांच्यासारेख अनुभवी खेळाडूही खेळताना अडखळे होते अशी माहिती समोर येत आहे कि इंदोर मध्ये तिसऱ्या कसोटीमध्ये लाल मातीच्या कसोटीसाठी लाल माहितीची खेळपट्टी तयार केली जात आहे. हे ऐकून ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या समस्या नक्कीच वाढून शकतात. इंदोर मधील लाल मातीची खेळपट्टी फिरकी गोलंदाजासाठी नक्कीच उपयुक्त ठरते. फिरकीसोबत हि खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करेल.

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी साठी इंदोर मध्ये लाल मातीची खेळपट्टी तयार केली जात आहे त्यासाठी मुंबईहून माती आणली जात आहे. लाल मातीची खेळपट्टी हि फिरकी गोलंदाज साठी आणि वेगवान गोलंदाजासाठी उपयुक्त ठरते. अश्या खेळपट्टयांवर फलंदाजी करणे सुद्धा सोपे असते. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसोबत खेळणे पूर्णपणे अपयशी ठरत आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढू शकतात. या सामन्यांमध्ये एकूण नऊ खेळपट्ट्या बनवल्या आहेत त्यात एक खेळपट्टी लाल मातीची असणार आहे.

हे ही वाचा :

उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना घातल्या तीन अटी

दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना इशारा, शिवसैनिकांचा पैसा त्यांना मिळाला पाहिजे…

देवेंद्र फडणवीस यांना काळीज नसेल .. टीका करत सुषमा अंधारे म्हणाल्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version