Monday, July 8, 2024

Latest Posts

Rohit-Virat-Jadeja नंतर Jasprit Bumrah ही निवृत्त होणार का?

जसप्रीत बुमराहने टी-२० वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद जिंकण्यात भारतीय संघासाठी मोठे योगदान दिले.

Jasprit Bumrah On Retirement Plan : जसप्रीत बुमराहने टी-२० वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद जिंकण्यात भारतीय संघासाठी मोठे योगदान दिले. त्याने स्पर्धेत ८.२७ च्या सरासरीने १५ विकेट घेतल्या आणि केवळ ४.१८ च्या इकॉनॉमीने धावा केल्या. या शानदार कामगिरीसाठी बुमराहला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून निवडण्यात आले. आता विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांच्या निवृत्तीनंतर बुमराहने त्याच्या निवृत्तीबद्दल चर्चा केली.

2024 मध्ये T20 चॅम्पियन बनताच विराट कोहलीने T20 International मधून निवृत्ती जाहीर केली होती. यानंतर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी-२० मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर एका दिवसानंतर संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजानेही टी-२० इंटरनॅशनलला निरोप दिला. आता 30 वर्षीय बुमराहनेही निवृत्तीबाबत चर्चा केली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सत्कार समारंभात बुमराह निवृत्तीबद्दल म्हणाला, “अजून खूप लांबचा पल्ला आहे. मी नुकतीच सुरुवात केली आहे. मला आशा आहे की ते अजून दूर आहे.” बुमराहने स्पष्ट केले की, सध्या कोणत्याही फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा त्याचा कोणताही विचार नाही.

सत्कार समारंभात विराट कोहलीने जसप्रीत बुमराहचे खूप कौतुक केले होते. त्याने बुमराहला राष्ट्रीय खजिना आणि जगातील 8 वे आश्चर्य असे वर्णन केले होते. कोहलीने सांगितले की, अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ३० चेंडूत ३० धावांची गरज होती, त्यानंतर बुमराहच्या अप्रतिम कामगिरीने भारताला विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे बुमराह हा भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळणारा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत ३६ कसोटी, ८९ एकदिवसीय आणि ७० टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत १५९विकेट्स, एकदिवसीय सामन्यात १४९ विकेट्स आणि आंतरराष्ट्रीय T20 मध्ये ८९ विकेट घेतल्या आहेत. जानेवारी २०१६ मध्ये त्याने भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये बुमराह टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss