Rinku Singh आणि Yashasvi Jaiswal ला मिळणार का भारतीय संघामध्ये स्थान?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने २०९ धावांनी भारतीय संघाचा पराभव केला.

Rinku Singh आणि Yashasvi Jaiswal ला मिळणार का भारतीय संघामध्ये स्थान?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने २०९ धावांनी भारतीय संघाचा पराभव केला. ऑस्ट्रेलियाने भारताला पहिल्याच इंनिंगमध्ये ४६९ धावांचा डोंगर उभा केला त्याच्या प्रत्युत्तरास भारताच्या संघाला फक्त २३४ धावा करता आल्या. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाचा संघ आयसीसी प्रत्येक ट्रॉफी जिंकणारी पहिली टीम ठरली. भारताच्या संघ सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठली होती. परंतु कालचा सामन्यात भारताचा संघ पराभूत झाल्यामुळे टीम इंडियाचे स्वप्न दुसऱ्यांदा अधुरे राहिले. इंडियन प्रीमियर लीग आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल नंतर भारताचे खेळाडू वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहेत.

भारताचा वेस्टइंडिज दौरा १२ जुलै पासून सुरु होणार आहे. वेस्टइंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यामध्ये कसोटी सामना, एकदिवशीय आणि टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहेत. भारताचा संघ या वेस्ट इंडिज दौऱ्यामध्ये २ कसोटी, ३ एकदिवशीय आणि ५ टी-२० सामने होणार आहेत. या वेस्ट इंडिज दौऱ्यानिमित्त २ नवे युवा खेळाडूंची भारताच्या संघामध्ये निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दोन्ही खेळाडूंनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये दमदार कामगिरी आहे ते दुसरे कोणी नसून यशस्वी जयस्वाल आणि रिंकू सिंह हे दोन खेळाडू आहेत. या दोघांना भारताच्या संघामध्ये स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऋतुराज गायकवाड याच्या जागी राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता. यशस्वीने आयपीएल १६ व्या मोसमातील १४ सामन्यांमध्ये ६२५ धावा ठोकल्या आहेत. त्याचबरोबर रिंकूच्या या सामन्यामध्ये ४ अर्धशतकांच्या मदतीने ४७४ धावांची खेळी खेळली आहे. रिंकू आणि यशस्वी या दोघांनीही यशस्वीपणे आपली छाप सोडली आहे. त्यामुळे आता या दोघांचे भारताच्या संघामध्ये निवड होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारताच्या संघाचे वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक –
कसोटी सामने
पहिला सामना – १२ ते १६ जुलै
दुसरा सामना – २० ते २४ जुलै

वनडे सामने
पहिला सामना – २७ जुलै
दुसरा सामना – २९ जुलै
तिसरा सामना – १ ऑगस्ट

टी 20 सामने
पहिला सामना – ४ ऑगस्ट
दुसरा सामना – ६ ऑगस्ट
तिसरा सामना – ८ ऑगस्ट
चौथा सामना – १२ ऑगस्ट
पाचवा सामना – १३ ऑगस्ट

हे ही वाचा:

लवकरच गाड्यांचा वेग वाढणार, Nitin Gadkari यांनी दिली माहिती!

Sharad Pawar यांना धमकी देणारा आरोपी गजाआड!

तुम्ही Dahi Toast कधी ट्राय केला आहे का? नसेल तर ही लज्जतदार रेसिपी फक्त तुमच्या साठी…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version