spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IND vs BAN 3rd ODI तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी रोहित शर्माच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळणार संधी

बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील सलग दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावा लागलं. ढाकाच्या शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या दुसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताला अवघ्या पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारताचं मालिकेतील आव्हान संपुष्टात आलंय. या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना १० डिसेंबरला (IND vs BAN 3rd ODI) खेळला जाणार आहे. यापूर्वी भारतीय संघाला (Team india) मोठा धक्का बसला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), वेगवान गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) आणि कुलदीप सेन (Kuldeep Sen) दुखापतीमुळं मालिकेतून बाहेर पडले आहेत. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी याबाबत माहिती दिलीय.

हेही वाचा : 

Gujarat- Himachal Election Result 2022 गुजरातमध्ये विजय पक्का, तर हिमाचलमध्ये भाजपला मोठा धक्का, कोण मारणार बाजी?

भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील मालिकेतील दुसरा सामना बुधवारी खेळला गेला. भारतीय क्रिकेट संघात मोठा बदल करण्यात आला होता. गेल्या सामन्यात पदार्पण करणारा युवा वेगवान गोलंदाज कुलदीप सेन या सामन्यात विश्रांती दिली. त्याला दुखापत झाल्यामुळे वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांती घेण्यास सांगितले आहे. त्याच्या जागी दुसरा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे.

दुसऱ्या सामन्यात बांगलादेशची फलंदाजी सुरु असताना दुसऱ्या षटकात झेल घेण्याच्या प्रयत्नात रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) याने दिलेल्या माहितीनुसार दुखापतीनंतर रोहित आता मायदेशी परतणार आहे. बांगलादेश विरुद्ध मालिकेतील तिसरा सामना हा १० डिसेंबरला चितगाव येथे होणार आहे.

आलिया पाठोपाठ रणबीर करणार का हॉलिवूडमध्ये पदार्पण?

पुढे द्रविड म्हणाले, “आमच्या संघातील खेळाडू दुखापतींशी झुंज देत आहेत, जे आमच्यासाठी चिंताजनक आहे. मला वाटतं की, रोहित शर्मा आणि दीपक चाहर अखेरच्या एकदिवसीय सामन्याला मुकणार आहेत. तर, कुलदीप सेनही मालिकेतून बाहेर पडलाय. रोहित शर्मा मुंबईला परतणार आहे. बांगलादेशविरुद्ध आगामी कसोटी मालिकेत तो खेळणार की नाही? हे काही दिवसांतच स्पष्ट होईल. त्याच्या दुखापतीबाबत आता भाष्य करणं योग्य ठरणार नाही. पण तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो खेळणार नाही, हे स्पष्ट झालंय.”

Avatar 2 ‘अवतार’ भारतात करणार रेकॉर्डब्रेक कमाई!

Latest Posts

Don't Miss