भारतीय महिला क्रिकेट टीमचे हेड कोच बदलणार?

१२ जुलै पासून भारताचा पुरुष क्रिकेट संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर असणार आहे. तर भारताचा महिला क्रिकेट संघ बांग्लादेश दौऱ्यावर रवाना होणार आहेत.

भारतीय महिला क्रिकेट टीमचे हेड कोच बदलणार?

१२ जुलै पासून भारताचा पुरुष क्रिकेट संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर असणार आहे. तर भारताचा महिला क्रिकेट संघ बांग्लादेश दौऱ्यावर रवाना होणार आहेत. भारताचे महिला क्रिकेट संघ आणि भारताचा पुरुष क्रिकेट संघ दोन्ही परदेश दौऱ्यावर असतांना टीम इंडियाच्या हेड कोच आणि चीफ सिलेक्टर संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भारताच्या महिला क्रिकेट संघाची हेड कोच आणि भारताच्या पुरुष क्रिकेट टीमच्या चीफ सिलेक्टरच्या नावाची घोषणा एकत्र होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या ऑनलाइन आणि ऑफ लाइन दोन्हीसाठी इंटरव्यू सुरु आहेत. बीसीसीआयची क्रिकेट सल्लागार समिती या दोन्ही महत्वाच्या पदांसाठी इंटरव्हू घेत आहेत.

३ जुलैच्या मुलाखतीमधून काही निष्कर्ष निघाला नव्हता त्यामुळे आजही इंटरव्यू सुरु असणार आहेत, इंटरव्यूनंतर सीएसी आज ४ जुलैलाच नवीन नावांची घोषणा करण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने भारतीय महिला क्रिकेट हेड कोच पदासाठी तीन नावे शॉर्टलिस्ट केली आहेत. यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाला २०१७ साली वनडे वर्ल्ड कपच्या फायनलपर्यंत घेऊन जाणारे तुषार अरोठे आहेत. दुसरे अमोल मजुमदार आणि तिसरे इंग्लंडचे जॉन लुईस आहेत. अमोल मजुमदार मुंबईचे माजी कोच आहेत. त्याशिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे.

CAC च्या ३ सदस्यीय समितीमध्ये सुलक्षणा नाइक, अशोक मल्होत्रा आणि जतीन परांजपे यांचा समावेश आहे. त्यांनी सर्वाचे इंटरव्यू घेण्यात आले आहेत. अमोल मजूमदार महिला टीमचे हेड कोच बनण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. मजूमदार यांचा इंटरव्यू ऑफलाइन झाला. अन्य दोघांचे इंटरव्यू ऑनलाइन झाले आहेत. क्रिकबजच्या रिपोर्ट्नुसार महिला क्रिकेट टीमचा हेड कोच आणि पुरुष क्रिकेट टीमच्या हेड कोचच्या नावाची घोषणा एकत्र होऊ शकते. चेतन शर्मा यांना हटवल्यापासून भारतीय पुरुष क्रिकेट टीमच चीफ सिलेक्टर पद रिक्त आहे. अजित आगरकर या शर्यतीत आघाडीवर आहेत.

हे ही वाचा:

मोदीच्या मंत्रिमंडळात दिसणार महाराष्ट्राचा प्रभाव?, ‘या’ नेत्यांना मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता

Thackeray Group Meeting, राजकीय घडामोडींनंतर ठाकरे गटाची आज महत्वाची बैठक

Aflatoon Trailer Launch | या दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करण अभिमानाची गोष्ट Tejaswini Lonari

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version