विजेता संघ होणार मालामाल, ICCकडून बक्षिसाची रक्कम जाहीर

विजेता संघ होणार मालामाल, ICCकडून बक्षिसाची रक्कम जाहीर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने आज दिनांक ३० रोजी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी २० वर्ल्डकपसाठीच्या बक्षीस रक्कमेची घोषणा केली. विजेत्या संघाला तब्बल १३ कोटी रूपयांच्यावर रक्कम मिळणार आहे. याबाबतची माहिती आयसीसीने आपल्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकात दिली आहे. आयसीसी म्हणते, ‘आयसीसी पुरूष टी २० वर्ल्डकप २०२२ चा विजेत्याची घोषणा १३ नोव्हेंबरला मेलबर्न येथे करणार आहे. या विजेत्या संघाला १.६ मिलियन अमेरिकन डॉलर (जवळपास १३ कोटी रूपयांच्यावर) रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येईल. याची निम्मी रक्कम ही उपविजेत्या संघाला देण्यात येईल.’

वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाला १.६ मिलियन डॉलर, उपविजेत्या संघाला ८ लाख मिलियन डॉलर दिले जातील. या स्पर्धेसाठी एकूण ५.६ मिलियन डॉलर इतकी रक्कम बक्षिसासाठी ठेवण्यात आली आहे. १६ संघात ही रक्कम वाटली जाईल. सुपर १२ स्टेजमध्ये १२ संघ आहेत, त्यापैकी ४ संघ सेमीफायनलमध्ये पोहोचतील. जे ८ संघ सुपर १२ फेरीतून बाहेर होतील त्यांना ७० हजार डॉलर दिले जाणार आहेत. गेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये ही रक्कम ४० हजार डॉलर आहे. जे चार संघ पहिल्या फेरीतून बाहेर होतील त्यांनी ४० हजार डॉलर मिळतील. तर पहिल्या फेरीत विजय मिळवणाऱ्या संघांना देखील इतकीच रक्कम मिळेल. या फेरीत १२ मॅच होतील, त्यासाठी आयसीसीकडून ४.८ लाख डॉलर दिले जातील.

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ येत्या १६ ऑक्टोबरपासून सुरू होईल. पहिल्या फेरीत वेस्ट इंडिज, श्रीलंकेसह एकूण ८ संघ भाग घेणार आहेत. यापैकी ४ संघ सुपर १२ साठी पात्र ठरतील. गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात २२ ऑक्टोबर रोजी सुपर १२ चा पहिला सामना खेळला जाईल. तर, भारताचा पहिला सामना २३ ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.

हे ही वाचा:

नोएडातील ओमॅक्स सोसायटी पुन्हा एकदा चर्चेत, अवैध बांधकामावर केली कारवाई

CM Shinde : ९० दिवसात मुंबईत अनेक बदल दिसतील, खड्डेमुक्ती कामासंदर्भात मुख्यमंत्रांचे आवाहन

Follow Us

Exit mobile version