Womens Asia Cup 2022: भारतीय महिलांनी सातव्यांदा जिंकला आशिया चषक

Womens Asia Cup 2022: भारतीय महिलांनी सातव्यांदा जिंकला आशिया चषक

महिला आशिया चषक २०२२ मधील अंतिम सामन्यात भारतानं श्रीलंकेचा आठ विकेट्सनं धुव्वा उडवला. या विजयासह भारतानं सातव्यांदा महिला आशिया चषकावर नाव कोरलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंकेच्या संघानं भारतीय गोलंदाज रेणुका सिंह (Renuka Singh), राजेश्वरी गायकवाड (Rajeshwari Gayakwad) आणि स्नेह राणाच्या (Sneh Rana) भेदक माऱ्यासमोर गुडघे टेकले. श्रीलंकेनं २० षटकात ९ विकेट्स गमावून भारतानंसमोर ६६ धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात स्मृती मानधनाच्या (Smriti Mandhana) अर्धशतकीय खेळीच्या जोरावर भारतानं हा सामना ८.३ षटकातच जिंकला.

अंतिम सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारताच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेची दाणादाण उडाली. २० षटकात त्यांना ९ बाद फक्त ६५ धावा करता आल्या. लंकेच्या फक्त दोघा फलंदाजांना दुहेरी धावसंख्या करता आली. भारताकडून रेणुका सिंगने ३ षटकात ५ धावा देत ३ विकेट घेतल्या. तर राजेश्वरी गायकवाड आणि स्नेह राणाने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. विजयासाठी फक्त ६६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात आलेल्या भारतीय संघाला ३२ धावांवर पहिला धक्का बसला. शेफाली वर्मा ५ धावांवर बाद झाली तर जेमिमा रॉड्रिग्ज फक्त २ धावा करून माघारी परतली. यामुळे भारताची अवस्था २ बाद ३५ अशी झाली होती. त्यानंत स्मृती मानधना आणि कर्णधार कौरने विजयाची औपचारीकता पूर्ण केली. स्मृतीने २५ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या, यात ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. कौरने नाबाद ११ धावा केल्या.

हे ही वाचा :

Raj Thackeray : मनसे अध्य्क्ष राज ठाकरे ‘वर्षा’वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

Diwali 2022 : दिव्यांग मुलांनी बनवलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version