Womens Asia Cup 2024: आशिया कपमधील भारतीय महिला संघाचे स्थान ठरणार अढळ

Womens Asia Cup 2024: आशिया कपमधील भारतीय महिला संघाचे स्थान ठरणार अढळ

जगातला सर्वात आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. हा खेळ अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत खेळला जातो. त्यात हा खेळ म्हणजे अगदी आबालवृद्धांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यात सध्या हा विशेष क्रिकेट सामना फार जोमाने सुरु आहे. अगदी सर्व मंडळी हा क्रिकेट सामना झाडून पाहतात. मुली आज कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. त्याचप्रमाणे त्या खेळाडूविश्वात सुद्धा मागे नाहीत. क्रिकेट विश्वात तर नाहीच नाही.

आज रविवारी (२८ जुलै) हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली आठव्यांदा आशिया कप जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज झालीय. एकदिवसीय आणि T-20 असे दोन्ही फॉरमॅट एकत्र केले तर हा नववा महिला आशिया कप आहे. पहिले चार महिला आशिया कप एकदिवसीय स्वरूपात खेळले गेले, तर २०१२ पासून स्पर्धेचे स्वरूप बदलून टी-२० असे करण्यात आले. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी भारतीय महिला टीम अंतिम फेरीत पोहोचली आहे. फक्त २०१८ मध्येच भारतीय महिलांना विजेतेपद पटकावता आलं नाही. त्यावेळी बांगलादेशच्या महिला टीमने बाजी मारली होती. श्रीलंकेची टीम मागच्या पराभवाचा बदला घेऊन पहिले विजेतेपद पटकावू शकेल का, हे आता पाहावं लागणार आहे. पण एकूण भारतीय महिलांचा परफॉर्मन्स पाहता श्रीलंका त्यांना हरवू शकेल असं वाटत नाही.

यंदाच्या आशिया कप स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी केली. महिला संघाने जवळजवळ एकतर्फी विजय मिळवले आहेत. भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी सलग चार सामने जिंकून अंतिम फेरी गाठली आहे. श्रीलंकेची कॅप्टन चमारी अथापट्टूच्या जबरदस्त कामगिरीमुळे श्रीलंकेचा संघही फायनलमध्ये पोहोचला आहे. पण यजमान संघाचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास सोपा राहिलेला नाही. सेमीफायनलमध्ये भारताने बांगलादेशचा ५४ बॉलमध्ये १० विकेट राखून पराभव केला. वेगवान गोलंदाज रेणुका सिंग आणि फिरकीपटू राधा यादवने प्रत्येकी तीन बळी घेतले. स्मृती मंधाना ५५ रन्स करून नाबाद राहिली आणि शफाली वर्मा २६ रन्स करून नाबाद राहिली. पाकिस्तानने सेमीफायनलमध्ये श्रीलंकेला कडवी झुंज दिली. पाकिस्तानच्या १४० रन्सचा पाठलाग करण्यात पाकिस्तान संघ अपयशी ठरला आणि श्रीलंकेने एक चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. याआधी भारताने पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला होता. तर UAE संघाचा भारताने ७८ रन्सने पराभव केला. नेपाळवरही ८२ रन्सनी विजय मिळवला. तर बांगलादेशचा १० विकेट राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. यजमान श्रीलंकेचा संघही अपराजित असूनही फायनलमध्ये त्यांची भारतासोबत टक्कर होणार आहे.

हे ही वाचा:

“शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण अधिकारी, डेप्युटी डायरेक्टर  सर्वांना फिल्डवर उतरून दर्जात्मक शिक्षण द्यावं लागणार” Deepak Kesarkar यांची घोषणा

Maharashtra Vidhanparishad Election : “मी शपथ घेतो/ घेते की ..” ; विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version