Women’s Asia Cup INDW vs PAKW Live : पाकिस्तानने भारतापुढे ठेवले १३८ धावांचे आव्हान

Women’s Asia Cup INDW vs PAKW Live : पाकिस्तानने भारतापुढे ठेवले १३८ धावांचे आव्हान

बांगलादेश येथे सुरू असलेल्या महिला आशिया चषक स्पर्धेतील तेरावा सामना आज भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळला जात आहे. भारतीय संघ या स्पर्धेत तीन सामने जिंकला असून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. तसेच त्यांनी पाकिस्तानला पराभूत केले तर ते उपांत्य फेरीत पोहोचतील. पाकिस्तानचा मागील सामन्यात थायलंडने पराभूत करत त्यांना चांगलाच धक्का दिला होता, त्यातून सावरत आणि स्पर्धेत आपले आव्हान कायम राखण्याच्या हेतूने ते मैदानात उतरणार आहेत. पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या शफाली वर्मा आणि किरण नवगिरे या दोघींना अंतिम अकरातून वगळले आहे. तर स्नेह राणाच्या जागी राधा यादवची संघात एंट्री झाली आहे. पाकिस्ताननेही दोन बदल केले आहेत. कायनात इम्तियाज आणि डायना बेग यांच्याजागी आयमान अन्वर आणि सादिया इक्बाल यांची अंतिम अकरामध्ये निवड केली आहे.

हेही वाचा : 

८ तास झोप, उपयुक्त आहार घेऊनही तुम्हाला थकवा जाणवतो?, तर “ही” असू शकतात गंभीर आजाराचे लक्षणे

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानला भारताने पॉवर प्लेमध्येच दोन धक्के दिले. पूजा वस्त्रकारने सिदरा आमीनला ११ धावांवर बाद केले. त्यानंतर दिप्ती शर्माने सहव्या षटकात मुनिबा अलीला १७ धावांवर तर याच षटकात ओमैमा सोहैलला शुन्यावर बाद करत पाकिस्तानची अवस्था ३ बाद ३३ अशी केली. पाकिस्तानची पॉवर प्लेमध्ये ३ बाद ३३ धावा अशी अवस्था झाली असताना कर्णधार बिसमाह मारूफ आणि निदा दार यांनी पाकिस्तानचा डाव सारवला. या दोघींनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला शतकी मजल मारून दिली. चौथ्या विकेटसाठी पाकिस्तानची कर्णधार मारूफ आणि दार यांनी ७६ धावांची दमदार भागीदारी रचली. मात्र ही भागीदारी रेणुका सिंगने मारूफला ३२ धावांंवर बाद करत फोडली. निदा दारच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने भारतापुढे ठेवले १३८ धावांचे आव्हान ठेवले.

Gambia Cough Syrup Death : कफ सिरप बद्दल पालकांच्या मनात संभ्रम, जाणून घ्या सिरप मुलाच्या शरीरावर कसं परिणाम करतं?

भारतीय महिला संघ :

स्मृती मानधना, सभिनेनी मेघना, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दयालन हेमलता, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, रेणुका सिंग, राजेश्वरी गायकवाड

पाकिस्तान महिला संघ:

मुनीबा अली (विकेटकीपर), सिद्रा अमीन, बिस्मा मारूफ (क), निदा दार, आयशा नसीम, ​​आलिया रियाझ, ओमामा सोहेल, आयमान अन्वर, सादिया इक्बाल, तुबा हसन, नशरा संधू

चमचमीत चिकन रोल’ रेसिपी घ्या जाणुन

Exit mobile version